Hashtagintro

Sudesh Berry : बॉलीवूड खानदानातील सून होण्याचं स्वप्न, पण प्रत्यक्षात मिळाली निराशा, सुदेश बेरी यांच्या सूनेचा धक्कादायक खुलासा

Sudesh Berry : बॉलीवूड खानदानातील सून होण्याचं स्वप्न, पण प्रत्यक्षात मिळाली निराशा, सुदेश बेरी यांच्या सूनेचा धक्कादायक खुलासा

Sudesh Berry : लोकप्रिय अभिनेते सुदेश बेरी यांनी अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पण त्यांची सून शांभवी शर्मा हिने त्यांच्या मुलावर गंभीर आरोप केले आहे. शांभबी हिने 2007 मध्ये MTV रोडीस 5.0 मध्ये स्पर्धक म्हणून ओळख मिळालेला. आता शांभवी पुन्हा दमदार पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत शांभवी हिने खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. लग्नानंतर आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा दावा शांभवी हिने केला असून, ‘सासरे चांगले होते, पण त्यांनी देखील कोणत्याच प्रकारे मदत केली नाही..’, असं देखील शांभवी म्हणाली. सांगायचं झालं तर, सुदेश बेरी यांच्या मुलाचं नाव सूरज बेरी असं आहे… तिने लग्नानंतर सुखी संसाराचे स्वप्न पाहिले होते. पण प्रत्येक गोष्ट धक्कादायक ठरली.

शांभवी म्हणाली, ‘वयाच्या 18 व्या वर्षी माझं अफेअर सुरु झालं. मला एकता कपूर आणि सुनील शेट्टी याच्या प्रॉडक्शन हाऊसमधून एका सिनेमासाठी ऑफर आलेली. त्या सिनेमात सूरज मु्ख्य अभिनेत्याच्या भूमिकेत होता. तेव्हा मी त्याच्या प्रेमात पडले. डेट करत असताना चार वर्ष कशी गेली कळलीच नाहीत. पहिल्या सिनेमानंतर माझ्यापुढे कामांची रांग लागली…’ याचदरम्यान सूरज यांनी तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. ‘मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मात्र, त्यासाठी तू तुझं करिअर सोडशील का?’ अशी अट त्याने घातली. त्यावर शांभवी हिने होकार दिला.

शांभवीने पुढे सांगितलं, तिने सूरज याला काही काळ अभिनय क्षेत्रात काम करण्याचा आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा पर्याय सुचवला होता. मात्र, त्याने तो नाकारला. सूरज याला मुंबई सोडून ऑस्ट्रेलियाला जायचं होतं. त्यांचं संपूर्ण कुटुंब ऑस्ट्रेलियात असल्याने काही काळ तिथे राहून पुन्हा भारतात परत येऊ, असं त्यांनी सांगितलं होतं.

‘बॉलिवूड कुटुंबात लग्न केले, पण अपेक्षित मदत मिळाली नाही’

शांभवीने आपल्या आई-वडिलांना सांगून बॉलिवूड कुटुंबात लग्न केलं. लग्नानंतर आयुष्य खूप सुंदर असेल, अशी तिची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही. लग्नानंतर तिला तिथून कोणतीही विशेष मदत मिळाली नाही. सुरुवातीच्या काही वर्षांत सासऱ्यांनी मुलाला आर्थिक मदत केली, मात्र आपल्याला अपेक्षित असलेला पाठिंबा मिळाला नाही, असे तिने सांगितले.

शांभवी हिने सांगितल्यानुसार, 2012 मध्ये तिचे लग्न झालं होतं. 2015 पर्यंत वैवाहिक आयुष्य सुरळीत होतं. मात्र, 2016 मध्ये हे लग्न टिकणार नाही, असं तिला जाणवू लागलं. सासरे सुदेश बेरी हे उत्तम अभिनेते आणि चांगले माणूस आहेत, पण त्यांनी मला कधीही मदत केली नाही, अशी खंतही शांभवी हिने व्यक्त केली. लग्नानंतर ऑस्ट्रेलियात जाणं माझ्यासाठी एखाद्या वनवासासारखं होतं, असंही शांभवी हिने स्पष्ट केलं.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language