जिनिलिया देशमुख आणि जॉन अब्राहम यांच्या लग्नाच्या अफवा पसरल्या होत्या. यावर आता खूप वर्षांनंतर अभिनेत्री जिनिलियाने मौन सोडले आहे. नेमके काय घडले होते यावर तिने आता भाष्य केले आहे.
सध्या गनमास्टर ९ या चित्रपटामुळे ती चर्चेत आहे. तिच्या या चित्रपटात ती इमरान हाश्मीसोबत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने एका चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या आणि जॉन अब्राहमच्या लग्नाच्या परलेल्या अफवांवर भाष्य केले आहे.
जिनिलिया म्हणाली की ” ते खूपच निर्थरक होत, मूर्खपणा होता, मला माहीत नाही कोणी हा फालतू PR स्टंट केला होता, पण हे मुद्दाम केलेले प्रकरण आहे हे नक्कीच. कारण कोणीतरी अचानक येऊन लग्न झालंय असं म्हणणार तरी नाही.
फोर्स १ मध्ये आम्ही काम केलं आणि यामुळे या अफवांना जोर मिळाला इतकंच, बाकी काही नाही. हा फक्त एक मूर्खपणा होता असं जिनिलियाने स्पष्टपणे बोलून दाखवले.
गनमास्टर जी ९ हा चित्रपट तिचा आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. जिनिलियाने तब्बल १० वर्षानंतर वेड या चित्रपटातून कमबॅक केला. आता ती बॅक टू बॅक वेगवेगळ्या प्रॉजेक्टमध्ये काम करताना दिसत आहे.
Source: TV9 Marathi Entertainment





