Hashtagintro

Rohit Sharma: मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहितलाच व्हायचंच नव्हतं, पण एका फॉन कॉलमुळे निर्णय बदलावा लागला

Rohit Sharma: मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहितलाच व्हायचंच नव्हतं, पण एका फॉन कॉलमुळे निर्णय बदलावा लागला

Rohit Sharma On Mumbai Indians Captain: इंडियन प्रीमियर लीगच्या आधी तीन वर्षांनंतर मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी पुन्हा निवड झालेल्या रोहित शर्माने आपल्या पुनरागमनाबद्दल एक अत्यंत भावनिक आणि आश्चर्यकारक खुलासा केला आहे. रोहितच्या संघात परतल्याने चाहते उत्साहित असताना, खुद्द ‘हिटमॅन’ने आता कबूल केले आहे की, सुरुवातीला “मला पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार व्हायचे नव्हते. मात्र, फ्रँचायझीचे मालक आकाश अंबानी यांच्यासोबत झालेल्या एका विशेष भेटीनंतर त्याने आपला विचार बदलला आणि संघाचे नेतृत्व करण्यास होकार दिला.”

मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर रोहित शर्माच्या विशेष मुलाखतीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात, रोहितने पडद्यामागील कहाणी सांगताना म्हटले, “जेव्हा आकाश अंबानींनी फोन केला, तेव्हा मी माझ्या पत्नीशी बोलत होतो. त्यानंतर, आम्ही भेटलो आणि संघाला पुढे कसे न्यायचे यावर सविस्तर चर्चा केली. आम्ही आमच्या कल्पना एकमेकांना सांगितल्या.”

रोहितने पुढे स्पष्ट केले की, “या संभाषणादरम्यान आकाश अंबानींनी मला पुन्हा कर्णधारपदाची ऑफर दिली. रोहितचे सुरुवातीचे उत्तर ‘नाही’ असे होते. सुरुवातीला मला वाटले की मी या कामासाठी तयार नाही. मी त्यांना सांगितले की मी घरी जाऊन विचार करेन. अलीकडे बरेच काही घडले होते आणि मी हे काम करू शकेन की नाही याची मला खात्री नव्हती.”

रोहित शर्मा सुरुवातीला संकोच करत असला तरी, मी आपल्या मनाकडे आणि मुंबई इंडियन्सशी असलेल्या आपल्या जुन्या आपुलकीकडे दुर्लक्ष करू शकला नाही. मी असे म्हणत नाही की संघाला माझी एक लीडर म्हणून गरज आहे. मला आतून वाटत होते की संघाला योग्य दिशेची गरज आहे. मला वाटले की हा संघ मी स्वतः तयार केला आहे. मी या संघाचे १० वर्षे कर्णधारपद भूषवले आहे. म्हणूनच मी विचार केला की हे आव्हान पुन्हा एकदा का स्वीकारू नये.”

मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२० पासून एकही ट्रॉफी जिंकलेली नाही. कर्णधार म्हणून रोहित आणि हार्दिक पांड्या या दोघांनाही २०२० पासून संघाला विजेतेपद मिळवून देता आलेले नाही. गेल्या काही हंगामांतील संघाच्या खराब कामगिरीबद्दल निराशा व्यक्त करताना रोहित म्हणाला, “खेळाडू म्हणून, मैदानावर आम्ही ज्या प्रकारे खेळलो त्यामुळे आम्ही खूप निराश झालो होतो. हे सर्व व्यावसायिक खेळाडूंसोबत घडते. मी फक्त एक-दोन खेळाडूंबद्दल बोलत नाही, तर संपूर्ण संघाबद्दल बोलत आहे. आम्ही प्लेऑफसाठी पात्र न ठरल्याबद्दल इतके निराश नव्हतो, तर चांगला क्रिकेट न खेळल्याबद्दल आणि आमच्या जबाबदाऱ्या पार न पाडल्याबद्दल निराश होतो.”

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language