Hashtagintro

हॉटेलच्या बेडवरचा रंगीत कपडा केवळ फॅशन नाही! यामागील धक्कादायक सत्य वाचून तुम्हीही व्हाल सावध

मुंबई : तुम्ही कधीही एखाद्या हॉटेलमध्ये मुक्कामासाठी गेलात, तर तिथल्या बेडवर 1 खास गोष्ट तुमच्या नक्कीच नजरेस पडली असेल. हॉटेलच्या बेडवर अंथरलेल्या पांढऱ्याशुभ्र चादरीच्या वर, पायांच्या बाजूला एक सुंदर आणि रंगीबेरंगी कापडाचा पट्टा अगदी व्यवस्थित इस्त्री करून ठेवलेला असतो. दिसायला अतिशय आकर्षक वाटणारा हा पट्टा अनेक जण केवळ खोलीची शोभा वाढवणारी डिझाईन किंवा फॅशन समजतात. मात्र, हॉटेल मॅनेजमेंटच्या भाषेत या कापडाच्या पट्टीला ‘बेड रनर’ असे म्हटले जाते आणि याच्या वापरामागे 1 अत्यंत महत्त्वाचे आणि व्यावहारिक कारण दडलेले आहे.
हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच अनेक पर्यटकांना 1 सवय असते की, ते आपली जड ट्रॅव्हल बॅग, हँडबॅग, जाकीट किंवा कधी कधी तर पायातले बूट-चप्पल न काढता थेट बेडच्या पायाशी ठेवतात. अशा वेळी बाहेरची धूळ, माती, घाम आणि इतर डाग थेट त्या पांढऱ्याशुभ्र चादरीवर लागू नयेत, म्हणून हा बेड रनर 1 प्रकारच्या सुरक्षा कवचासारखा काम करतो.
https://www.prahaar.in/2026/11/24/make-a-quick-sweet-potato-chaat-for-your-evening-hunger-a-tasty-and-nutritious-recipe/
अनेकांना असाही प्रश्न पडतो की, हॉटेलमध्ये नेहमी पांढऱ्याच रंगाच्या चादरी का वापरल्या जातात? यामागे 1 मुख्य कारण म्हणजे पांढऱ्या रंगावर कोणतीही घाण किंवा डाग लगेच उठून दिसतात. त्यामुळे स्वच्छता राखणे आणि ग्राहकांना हायजीनची खात्री देणे हॉटेल व्यवस्थापनासाठी सोपे जाते. परंतु पांढरा रंग जितका स्वच्छ व आकर्षक दिसतो, तितकाच तो सांभाळणे आणि डागमुक्त ठेवणे आव्हानात्मक असते. प्रवासी जेव्हा बेडच्या कडेला बसून बूट घालतात किंवा काढतात, तेव्हा याच भागाला सर्वाधिक स्पर्श होतो. हाच विचार करून बेड रनर योग्य जागी ठेवला जातो, जेणेकरून मुख्य चादर दीर्घकाळ स्वच्छ राहील.
‘होममेकिंग डॉट कॉम’च्या 1 अहवालानुसार, हा बेड रनर खोलीच्या सौंदर्यात भर घालत असला तरी, प्रवाशांनी स्वच्छतेबाबत सावध राहणे गरजेचे आहे. हॉटेल क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार, प्रत्येक ग्राहक बदलल्यानंतर बेडशीट आणि उश्यांचे कव्हर जसे न चुकता धुवून बदलले जातात, तसा हा बेड रनर प्रत्येक वेळी धुतलाच जातो असे नाही. अनेकदा तो केवळ नीट इस्त्री करून पुन्हा बेडवर ठेवला जातो. त्यामुळेच, जर तुम्ही हॉटेलच्या खोलीत निवांत आराम करणार असाल, तर आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टीने हा बेड रनर बाजूला काढून ठेवणे अधिक सुरक्षित ठरते.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language