Hashtagintro

Akash Deep: आधी बाउंसर टाकला अन् नंतर भर मॅचमध्ये आकाश दीपला वॉर्निंग दिली, कायल जेमिन्सनचा Video पाहून तुम्हालाही येईल राग

Akash Deep: आधी बाउंसर टाकला अन् नंतर भर मॅचमध्ये आकाश दीपला वॉर्निंग दिली, कायल जेमिन्सनचा Video पाहून तुम्हालाही येईल राग

IND vs NZ 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात क्राइस्टचर्च येथे खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात भारतीय संघ मोठ्या संकटात सापडलेला पाहायला मिळाला. प्रथम फलंदाजी करताना, भारतीय संघ पहिल्या डावात केवळ २४६ धावांवर सर्वबाद झाला. ध्रुव जुरेल एकटा खिंड लढवत होता. तो बाद झाल्यानंतर आकाश दीप आणि गुरनूर ब्रार हे दोन गोलंदाज मैदानात उभे राहिले होते. हेच पाहून कायल जेमिन्सन चिडला आणि त्याने बाउन्सरचा मारा सुरु केला.

जेमिन्सनचे दोन बाउंसर आकाश दीपच्या हेल्मेटवर आदळले. यानंतर कन्कशन सब्सिट्यूट करण्यात आले. प्रसिद्ध कृष्णाला सामील करण्यात आले. आकाश दीप आता प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडला आहे. आता आकाशदीपवर बाउंसरचा मारा केल्यानंतरचा जेमिन्सनची प्रतिक्रिया काय होती याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

कायल जेमिन्सन म्हणाला की, “काय? त्याने आमच्यासोबत हे केलं. मी त्याची पर्वा का करावी? का? जर त्याने आमच्यासोबत असं केलं, तर आम्ही प्रत्युत्तर देऊ. आम्ही सुरुवात केली नाही, पण आम्ही ते संपवू.” असं म्हणत त्याने आकाश दीपला भर सामन्यात धमकी दिल्याचे समजत आहे. याचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे.

जेमिसनच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होते की त्याने आकाश दीपला जाणूनबुजून बाउन्सर टाकला. जेमिसनने असे केले कारण भारतीय गोलंदाजांनीही न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांना जाणूनबुजून धोकादायक बाउन्सर टाकले होते. पुन्हा, जेमिसनचे बाउन्सर इतके विनाशकारी होते की आकाश दीप गंभीर जखमी झाला आणि त्याला सामन्यातून बाहेर बसावे लागले. बीसीसीआयने आकाश दीपच्या जागी डोक्याला दुखापत झाल्यामुळे बदली खेळाडू म्हणून प्रसिद्ध कृष्णाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले.

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language