Hashtagintro

मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातील स्वयंपाकघराचा परवाना निलंबित, FDA ची कारवाई

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (FDA) शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) मुलुंड येथील फोर्टिस रुग्नालयातील स्वयंपाक घराचा परवाना निलंबित केला आहे. फोर्टिस हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी अन्न तयार होणाऱ्या सोडेक्सो किचनमध्ये झुरळे, ड्रेनेजमध्ये अन्नकचरा, बुरशीयुक्त अन्नवाहतूक डबे आणि गंजलेले चाकू आढळल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे FDA ने ही कारवाई केली आहे. थर्ड पार्टी आहार सेवा प्रदाता म्हणून स्वयंपाकघर चालवणाऱ्या मे. सोडेस्को इंडिया सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या नावावर असलेला अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे. रुग्णालयाच्या स्वयंपाकघराच्या तपासणीनंतर करण्यात आलेले हे निलंबन, राज्य अन्न व स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न आस्थापनांवर राज्य अन्न व औषध प्रशासनाकडून सुरु असलेल्या व्यापक कारवाईचाच एक भाग आहे.
ही कारवाई मुंबईतील इतर अनेक आस्थापनांवरही करण्यात आली. फोर्टिस हॉस्पिटलने म्हटले आहे की, त्यांनी या निरीक्षणांची गांभीर्याने दखल घेतली असून, आपल्या खाद्यसेवा पुरवठादाराला या त्रुटी दूर करण्याचे आणि अन्नसुरक्षा मानकांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच रुग्णांची सुरक्षितता, सेवेचा दर्जा आणि स्वच्छता यांना सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे देखील फोर्टिस रुग्णालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
https://www.prahaar.in/2026/10/17/first-city-bus-service-to-be-launched-in-panvel-%e2%82%b9288-crore-project-approved/
फोर्टिस हॉस्पिटलने पुढे म्हटले आहे की, ‘आमच्या बाह्य आहार सेवा पुरवठादाराद्वारे चालवल्या जाणाऱ्या आणि संबंधित अन्न व्यवसाय परवाना असलेल्या, रुग्णालयातील स्वयंपाकघरासंदर्भात FDA कडून आलेल्या पत्राची नोंद घेतली आहे. राबवण्यात येत असलेल्या सुधारणात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी सेवा पुरवठादाराशी समन्वय साधला जात आहे. “रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सुरक्षित, पौष्टिक जेवणाचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा यासाठी, जिथे जिथे गरज आहे तिथे योग्य पर्यायी व्यवस्था केली जात आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language