Hashtagintro

Abhijeet Dipke On Tiger Shroff : ‘..तेव्हा असचं घडतं’, टायगर श्रॉफवरच्या हल्ल्यानंतर अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया

Abhijeet Dipke On Tiger Shroff : ‘..तेव्हा असचं घडतं’, टायगर श्रॉफवरच्या हल्ल्यानंतर अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके बोलले आहेत. सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांनी नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी खऱ्या आरोपींकडे लक्ष दिलं पाहिजे असं दीपके यांनी म्हटलं आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांना मागच्या आठवड्यात दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्यांचे दोन सहकारी आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना सुद्धा अटक केली होती. सध्या जामिनाच्या अटीवर अभिजीत दीपके बाहेर आहेत. “विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी खऱ्या आरोपींवर लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा सरकार आणि पोलीस चुकीच्या गोष्टींना प्राथमिकता देतात तेव्हा असचं घडतं” असं अभिजीत दीपके म्हणाले.

जुहूमध्ये रविवारी संध्याकाळी दोन अज्ञात हल्लेखोरांनी अभिनेता टायगर श्रॉफला टार्गेट केलं. त्याच्या कारवर चार ते पाच राऊंड फायरिंग केली. टायगर श्रॉफ या हल्ल्यातून थोडक्यात बचावला. पण ड्रायव्हरसह दोन जण या हल्ल्यात जखमी झाले. या घटनेनंतर तात्काळ लॉरेंन्स बिश्नोई गँगशी संबंधित अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी जबाबदारी घेतली. “जे कोणी फिल्म इंडस्ट्रीत आमचं ऐकणार नाहीत, सलमान खान सोबत काम करतील, पुढचा नंबर त्यांचा असेल” अशी धमकी त्यांनी दिली आहे.

शक्य ती सर्व मदत देण्याचं आश्वासन

मुंबई पोलिसांनी हल्लेखोराच्या तपासासाठी 15 टीम्स बनवल्या आहेत. हल्लेखोर आणि त्याच्या बाइक शोधण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. अनेक ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. फॉरेंन्सिक टीम पुरावे गोळा करत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा टायगर श्रॉफशी चर्चा केली. शक्य ती सर्व मदत देण्याचं आश्वासन दिलं.

व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर या गोळीबाराच्या घटनेचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. टायगर श्रॉफवरील गोळीबाराची ही घटना बॉलिवूडला हादरवून सोडणारी आहे. दोन वर्षांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगने माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची अशाच प्रकारे निर्घृण हत्या केली होती. सुदैवाने टायगर श्रॉफ या हल्ल्यातून बचावला.

 

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language