Hashtagintro

Abhijeet Kelkar: बिल्डरचे गुंड येऊन धमक्या देऊन… अभिजीत केळकरची पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडलं?

Abhijeet Kelkar: बिल्डरचे गुंड येऊन धमक्या देऊन… अभिजीत केळकरची पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडलं?

आजकाल मराठी कलाकार हे सामाजिक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका घेऊ लागले आहेत. एखाद्या मुलाखतीमध्ये किंवा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ते त्यांचे मत स्पष्ट मांडताना दिसतात. सध्या सर्वत्र मराठमोळा अभिनेका अभिजीत केळकरच्या पोस्टची चर्चा सुरु झाली आहे. त्याने शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने या पोस्टमध्ये थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग केले आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया…

अभिजीतने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत मुंबईतील मालाड पूर्व येथे असलेल्या चाळीवर काही लोकप्रतिनिधी आणि बिल्डर मिळून नागरिकांची घरे जमीनदोस्त केल्याचे म्हटले आहे. यासाठी बिल्डरने या लोकांना रात्रीत धमकावल्याचे सांगितले आहे.

काय आहे अभिजीतची पोस्ट?

कुठला बिल्डर, redevelopment मधे घरं अशा पद्धतीने अर्धवट तोडतो? ना कुठे पत्रे मारले आहेत, ना मलिदा वाहून न्यायला जोडणारा रोड आहे. या जागेत जायला फक्त एका बाजूला माणसं जाऊ येऊ शकतील एवढा एक पूल आहे. कनेक्टेड रोडच नसताना कसा होणार आहे हा प्रोजेक्ट? मुळात ज्यांची जमीन आहे, त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं एनओसी घेतलेलं नाही. त्यामुळे त्या जागेचे मालक कोर्टात गेलेले आहेत. उद्या सगळं जमीनदोस्त केल्यावर कोर्टाने प्रोजेक्टलाच स्टे दिला तर ना लोकांना घरं मिळणार ना भाडं, कसा होणार आहे हा प्रोजेक्ट?

शेजारी मिलिटरी कॅम्पस आहे. COD त्यानुसार, ठराविक हद्दीत, ठराविक एका उंचीच्या वर इमारती बांधायला परवानगी असूच शकत नाही. in that case, घरं जमीनदोस्त केल्यावर डिफेन्सने आक्षेप घेतला तर मग कसा होणार आहे हा प्रोजेक्ट??? लोकांना रोज रात्रंदिवस बिल्डरचे गुंड येऊन धमक्या देऊन घरं रिकामी करायला लावत आहेत आणि अर्धवट डॉक्युमेंट्स करून तात्काळ ही अशी अर्धवट तोडत आहेत. गेली ५०-६० वर्षं तिथे राहिलेल्या पण बिल्डरला न घाबरणाऱ्या लोकांना SRA करवी, अपात्र करण्यात आलं आहे. गावगुंडांनी तिथे अनधिकृत झोपड्या बांधून त्या पात्र करून घेतल्या आहेत, हा SRA चा कारभार

हे सगळं मी ऐकीव बोलत नाहीये, हे सगळं मी ही भोगतोय… या ऊपर जाऊन मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने, तिकडच्या so called लोकप्रतिनिधींना विचारतो, आम्हाला चाळीतल्या लोकांना त्यांची हक्काची घरं मिळतील, अपात्र करण्यात आलेल्या लोकांना पात्र करतील, ह्याची जबाबदारी तुम्ही घेताय का? तसं लेखी देत असाल तर तुम्ही म्हणाल तिकडे आम्ही सह्या करू, बोला घेताय जबाबदारी?

सध्या सोशल मीडियावर अभिजीत केळकरची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टच्या शेवटी त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग केले आहे.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language