Hashtagintro

Ahilyanagar Crime: वाकोडीत पित्याच्या खुनप्रकरणी दोन्ही मुलांना अटक

नगर: संशयातून आईला मारहाण करणाऱ्या नशेखोर पित्याचा मुलांनीच खून केल्याची घटना उघडकीस आली. वाकोडीतील या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन्ही मुलांना अटक केली आहे. रोहित दिलीप भोसले (वय २१) आणि अंबर दिलीप भोसले (वय १९) अशी अटकेतील मुलांची नावे आहेत.

दिलीप करमदास भोसले असे मृत पित्याचे नाव आहे. आईला होणारी मारहाण व मुलांनाही त्रास देत असल्याने संतापाच्या भरात कृत्य केल्याची कबुली दोन्ही मुलांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. शनिवारी (२४ ऑक्टोबर) रात्री अकराच्या सुमारास वाकोडी (ता.नगर) येथील पाण्याच्या टाकीजवळ दिलीप भोसले यांना अज्ञात व्यक्तींनी मारहाण करून ठार मारले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. भिंगार पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला संशयित आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, अंमलदार अतुल लोटके, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे, प्रशांत राठोड, भगवान धुळे यांचे पथक तयार केले. पथकाने घटनास्थळी भेट देऊन गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे समांतर तपास सुरू केला.

तपासादरम्यान दिलीप भोसले यांच्या मुलांचा या खुनात सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दिलीप भोसले हे दारू पिऊन पत्नीला संशयावरून मारहाण करत असत. तसेच ते मुलांनाही त्रास देत असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

कर्जबाजारीपणावरूनही घरात वाद होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या पार्श्‍वभूमीवर रागाच्या भरात दोन्ही मुलांनी वडिलांचा खून केल्याचा संशय तपासातून खरा निघाला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर रोहित आणि अंबर भोसले यांना या प्रकरणात अटक करण्यात आली.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language