Hashtagintro

Ajinkya Deo: विजू चप्पल घेऊन मारायला… अजिंक्य देव यांच्यासोबत काय घडलं होतं?

Ajinkya Deo: विजू चप्पल घेऊन मारायला… अजिंक्य देव यांच्यासोबत काय घडलं होतं?

मराठी चित्रपटसृष्टीमधील हिट सिनेमांच्या यादीमधील एक नाव म्हणजे ‘माहेरची साडी.’ गुजराती सिनेमाचा रिमेक असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आवडली होती ती चित्रपटगृहांबाहेर अक्षरश: रांगाच्या रांगा लागायच्या. आता या जवळपास या चित्रपटाच्या प्रदर्शनाला 25 वर्षे उलटून गेली आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या अंजिक्य देव यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.

अभिनेते अजिंक्य देव यांनी नुकताच एका पॉडकास्टमध्ये माहेरची साडी सिनेमातील लोकप्रिय गाणे नेसून माहेरची साडी गाण्याचा किस्सा सांगितला आहे. ते म्हणाले की, “नेसूनी माहेरची साडी हे जे गाणं होतं त्याची सहा कडवी होती. मी आणि विक्रम तर खूप बिझी होतो. कारण बाकी माझे हिंदी चित्रपट चालले होते आणि मराठी पण. सुबल सरकार हे या गाण्याचे कोरिओग्राफर होते. त्यांनी बाजूला घेतलं आणि म्हणाले दादा 6 अंतरे कौन सुनेगा? इसको काटो, छोटा करो… ”

अजिंक्य देव यांनी सांगितलं काय घडलं नेमकं?

पुढे ते म्हणाले की, “दादांनी विजूला बाजूला घेतलं आणि म्हटलं बहोत ज्यादा है… क्यो करता है ऐसा.. कम करो… आणि तीन अंतरे उडवले. तीन अंतर शूट केले. दोन दिवसांनंतर गाणं केलं आणि आम्ही पळालो. चित्रपट चालल्यानंतर विजू जवळपास चप्पल घेऊन मारायलाच येणार होता आम्हाला. तो म्हणाला अजून सहा अंतरे असते तर माझा चित्रपट आणखी 100 आठवडे चालला असता. या गोष्टी तुम्हाला कळत नसतात काय चालेल.”

माहेरची साडी सिनेमाविषयी

माहेरची साडी हा सिनेमा 1991मध्ये प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा त्यावेळी सुपरहिट ठरला होता. लोक हा सिनेमा पाहण्यासाठी थिएटर बाहेर गर्दी करत होते. कित्येक महिने या चित्रपटाचे शो हे हाऊस फूल झाले होते. या सिनेमात ज्येष्ठ अभिनेत्री अल्का कुबल आणि अजिंक्य देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कोंडके यांनी केले आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language