Hashtagintro

Ajinkya Deo On Ramayana : फालतूची थट्टा मस्करी…अजिंक्य देव यांनी सांगितला ‘रामायण’च्या सेटवरचा अनुभव

Ajinkya Deo On Ramayana : फालतूची थट्टा मस्करी…अजिंक्य देव यांनी सांगितला ‘रामायण’च्या सेटवरचा अनुभव

नितेश तिवारी यांचा ‘रामायण’ हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 15 दिवस झाले आहेत. अवघ्या 15 दिवसांत ‘रामायण’नं 1500 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्यासोबत अनेक कलाकार आहेत. अशातच आता इंडिया टीव्हीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत, चित्रपटात विश्वामित्र ऋषींची भूमिका साकारणाऱ्या अजिंक्य देव यांनी मुख्य कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव, सेटवरील वातावरण याबद्दल भाष्य केलं आहे.

‘रामायण’च्या सेटवर वातावरण कसं होतं?

‘रामायण’च्या सेटवरील वातावरणाबद्दल बोलताना अजिंक्य देव म्हणाले, ‘सेटवर फालतूची थट्टा मस्करी नव्हती, कारण जेव्हाही नितेश सर सेटवर यायचे, तेव्हा ते शॉटसाठी पूर्णपणे तयार असायचे. शॉट्सच्या मधल्या वेळेत आम्ही आमच्या पात्रांबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल गप्पा मारायचो. पण, आम्ही साकारत असलेल्या पात्रापासून कधीही विचलित झालो नाही.’

अजिंक्य देव म्हणाले, ‘मला दाढी होती, त्यामुळे तयार होऊन सेटवर यायला मला जवळपास दोन तास लागायचे. अर्थात, सेटवर सगळं काही उत्तम होतं, एसी वगैरे होतं, पण एकदा का तुम्ही पोशाख घातला की, आम्ही फक्त एकमेकांना विचारायचो, ‘अरे यार, आज कसा दिसतोयस? आज कुठे व्यायाम केलास? आज काय केलंस?’ आम्ही फक्त अशाच गोष्टींबद्दल बोलायचो. बाकीचे सर्वजण आपापल्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून असायचे आणि मला वाटतं की, संपूर्ण सेटवरचं वातावरण खूप पवित्र होतं.’

नितेश तिवारींसोबत काम करण्याचा अनुभव

नितेश तिवारींसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना अजिंक्य म्हणाले, ‘आणि नितेश… सेटवर ते फारसे जाणवतही नाहीत, कारण ते खूप शांत आणि संयमी आहेत आणि सेटवर ते तसेच राहिले. त्यामुळे, कोणताही गोंधळ किंवा आरडाओरडा नव्हता. एकंदरीत, सेटवर काम करण्याचा अनुभव खूप छान होता.’

शूटिंगदरम्यान कोणासोबत सर्वात चांगलं जमलं, असं विचारल्यावर अजिंक्य म्हणाले की, लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या रवी दुबेसोबत त्यांचं चांगलं जमायचं. अजिंक्य देव म्हणाले की, ‘मला वाटतं की, माझं सगळ्यांसोबतच चांगलं जमलं, विशेषतः रवी दुबेसोबत. आम्ही सेटबाहेरही अनेक वेळा भेटलो. आम्ही खूप वेळा भेटलो, त्यामुळे आमचं खूप चांगलं जमलं. रणबीर कपूरसोबतही माझं चांगलं जमलं, पण अर्थातच, तो या प्रोजेक्टव्यतिरिक्त इतर प्रोजेक्ट्समध्ये खूप व्यग्र आहे. आमच्या सर्वांमध्ये खूप चांगली मैत्री झाली.’

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language