Hashtagintro

Ajintha Ghat Accident : अजिंठा घाटात अपघातामुळे ११ तास वाहतूक विस्कळीत

Traffic disrupted for 11 hours in Ajintha Ghat due to an accident

अजिंठा, पुढारी वृत्तसेवा : अजिंठा घाटातील दर्गा परिसरात गुरुवारी (दि. १२) रात्री साडेअकराच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात किराणा सामानाने भरलेला ट्रक उलटला तर दोन जण गंभीर जखमी झाले. अपघातामुळे घाटातील वाहतूक तब्बल ११ तास विस्कळीत झाली. त्यातच बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतुकीची कोंडी वाढल्याने प्रवाशांना रात्रभर मनस्ताप सहन करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावहून बीडकडे किराणा सामान घेऊन जाणारा ट्रक (एमएच २३, ५२९७) घाट चढत असताना दर्याजवळ समोरून येणाऱ्या रिकाम्या ट्रकने (आरजे ०९ जीबी ८९८७) त्याला जोरदार धडक दिली. धडकेमुळे किराणा सामानाने भरलेला ट्रक रस्त्यावर उलटला. यात आतिश चंद्रभान राठोड (वय २६, रा. बीड) आणि प्रलयनाथ धाकन (वय ५५, रा. राजस्थान) हे दोघे गंभीर जखमी झाले.

त्यांना तातडीने अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. पहाटे चार वाजता पलटी झालेल्या ट्रकमधील किराणा सामान दुसऱ्या ट्रकमध्ये हलविण्यात आले.

दरम्यान, घाटातील अन्य ठिकाणी एमएच १९ सीवाय ९६३१ क्रमांकाचा ट्रक तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा अधिकच वाढला. अपघातानंतर वाहतूक नियंत्रणासाठी तीन होमगार्ड तैनात करण्यात आले होते. एका बाजूची वाहतूक थांबवून दुसऱ्या बाजूने टप्प्याटप्प्याने वाहनांना मार्ग दिला जात होता. मात्र, काही वाहनचालकांनी नियमांचे उल्लंघन करून वाहनांच्या रांगा तोडत पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांची गर्दी वाढली.

परिणामी, अनेकदा सलग दोन-दोन तास वाहतूक ठप्प राहिली. अखेर शुक्रवारी सकाळी दहा वाजता क्रेनच्या सहाय्याने उलटलेला ट्रक सरळ करून रस्त्याच्या बाजूला हटविण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या काळात अजिंठा पोलिस ठाण्याचे अंमलदार संतोष पाईकराव, दिलीप तडवी, दीपक पाटील तसेच होमगार्ड भारत घन, अमोल पगारे व सागर इंगळे यांनी वाहतूक नियंत्रणासाठी प्रयत्न-

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language