Hashtagintro

Anirudh-Kavya Wedding: अनिरुद्ध-काव्याचं ‘सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज’; 100 वर्षांपूर्वी सुरू झाली होती परंपरा, नेमकं त्यात काय असतं?

Anirudh-Kavya Wedding: अनिरुद्ध-काव्याचं ‘सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज’; 100 वर्षांपूर्वी सुरू झाली होती परंपरा, नेमकं त्यात काय असतं?

Anirudh-Kavya wedding: सध्या मनोरंजनविश्वात संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादची सहमालक काव्या मारन यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. ग्रीसमध्ये पार पडलेल्या या शाही विवाहसोहळ्याने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र, या लग्नाची सर्वाधिक चर्चा त्याच्या भव्यतेपेक्षा लग्न करण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे होत आहे. अनिरुद्ध आणि काव्या यांनी पारंपरिक धार्मिक विधींपेक्षा वेगळा मार्ग निवडत ‘सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज’ (Self-Respect Marriage) पद्धतीने विवाह केला. नेमकं काय आहे हे सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज? यामागे कोणती परंपरा आहे? जाणून घेऊया.

काय आहे सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज?

सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज म्हणजेच आत्मसन्मान विवाह. लग्नासाठी पुरोहित, मंत्रोच्चार, हवन किंवा धार्मिक विधी अनिवार्य नसतात. या विवाहपद्धतीत दोन व्यक्तींची परस्पर संमती, समानता आणि एकमेकांप्रती असलेली बांधिलकी यांना सर्वाधिक महत्त्व दिलं जातं. या पद्धतीत वधू-वर एकमेकांना वरमाला घालू शकतात, अंगठी किंवा मंगळसूत्राची देवाणघेवाण करू शकतात. तसंच कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत एकमेकांना जीवनसाथी म्हणून स्वीकारण्याची घोषणा करू शकतात. अनिरुद्ध आणि काव्या यांनीही ग्रीसमधील विवाहसोहळ्यात एकमेकांना वरमाळा घातल्या आणि एकसारख्या पेंडंट असलेल्या चेनची देवाणघेवाण केली. डीएमकेचे आयटी विंग सचिव टी. आर. बी. राजा यांनी सोशल मीडियावर या विवाहपद्धतीला दुजोरा दिला.

पहा फोटो-

 

View this post on Instagram

 

A post shared by Anirudh (@anirudhofficial)

100 वर्षांपूर्वी सुरू झाली होती परंपरा

सेल्फ रिस्पेक्ट मॅरेजची मुळे तामिळनाडूमधील सामाजिक सुधारणांच्या चळवळीत आहेत. समाजसुधारक ई. व्ही. रामासामी पेरियार यांनी 1925 मध्ये सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट सुरू केली होती. जातिभेद, उच्च-नीचता, महिलांवरील अन्याय आणि सामाजिक विषमता यांना विरोध करणे हा या चळवळीचा मुख्य उद्देश होता. पेरियार यांचं मत होतं की, विवाहासाठी धार्मिक कर्मकांड किंवा पुरोहितांची परवानगी आवश्यक नसावी. स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान अधिकार आणि आत्मसन्मान मिळायला हवा. विवाह हा दोन व्यक्तींमधील परस्पर संमतीचा आणि समानतेचा संबंध असावा, अशी या चळवळीची भूमिका होती.

1967 मध्ये मिळाली कायदेशीर मान्यता

सुरुवातीच्या काळात या विवाहपद्धतीला सामाजिक आणि कायदेशीर विरोधाचा सामना करावा लागला. मात्र, 1967 मध्ये तामिळनाडूमधील तत्कालीन मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांच्या सरकारने हिंदू विवाह कायद्यात सुधारणा केली. यामध्ये कलम 7-A समाविष्ट करण्यात आले. त्यानुसार सेल्फ रिस्पेक्ट आणि सुधारणावादी विवाहांना कायदेशीर मान्यता मिळाली. या तरतुदीनुसार नातेवाईक, मित्र किंवा साक्षीदारांच्या उपस्थितीत वर-वधूने एकमेकांना जीवनसाथी म्हणून स्वीकारणं, वरमाला किंवा अंगठीची देवाणघेवाण करणं अशा पद्धतीने विवाह करता येतो.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language