Hashtagintro

Ashok Saraf : सलमाननं माझ्या गळ्याला चाकू लावला अन्…शूटिंगदरम्यान थोडक्यात बचावलेले अशोक सराफ; सांगितलेला धक्कादायक प्रसंग

Ashok Saraf : सलमाननं माझ्या गळ्याला चाकू लावला अन्…शूटिंगदरम्यान थोडक्यात बचावलेले अशोक सराफ; सांगितलेला धक्कादायक प्रसंग

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. विनोदी भूमिका असो किंवा गंभीर व्यक्तिरेखा, प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपली छाप पाडली. मराठीसोबतच त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याच्यासोबतही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली आहे. मात्र, सलमानसोबत काम करताना त्यांना एकदा जीवघेण्या प्रसंगाचा सामना करावा लागला होता. एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जागृती’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा हा धक्कादायक प्रसंग सांगितला.

 

 

अशोक सराफ यांनी सांगितला प्रसंग

‘जागृती’ चित्रपटात अशोक सराफ यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सलमान खान आणि अशोक सराफ यांच्यात एक महत्त्वाचा सीन होता. या सीनमध्ये सलमानला अशोक सराफ यांच्या गळ्याला चाकू लावायचा होता. मात्र, या दृश्याच्या शूटिंगदरम्यान वापरण्यात आलेला चाकू खरा होता. त्यामुळे हा प्रसंग अशोक सराफ यांच्यासाठी चांगलाच धोकादायक ठरला. रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी सांगितलं की, सलमाननं त्यांच्या गळ्याजवळ खरा चाकू धरला होता. सीन सुरू झाल्यानंतर चाकूची धार त्यांच्या गळ्याला लागली आणि जखम होऊ लागली.

या प्रसंगाची आठवण सांगताना अशोक सराफ म्हणाले होते की, ‘त्याने माझ्या गळ्याला चाकू लावला होता आणि तो खरा चाकू होता. आम्ही डायलॉग बोलायला सुरुवात केली आणि मी त्याच्या पकडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागलो. सलमान चाकू जोरात दाबत होता. तेव्हा मी त्याला म्हणालो, ‘हळू दाब, इथे गळा कापला जातोय.’ अशोक सराफ यांनी सलमानला चाकू उलटा पकडण्याचा सल्लाही दिला होता. मात्र, सलमानने कॅमेरा समोर असल्यामुळे चाकू उलटा पकडल्याचं सीनमध्ये स्पष्ट दिसेल, असं सांगितलं. त्यामुळे अखेर तो सीन तसाच पूर्ण करण्यात आला.

शूटिंग पूर्ण झाल्यानंतर अशोक सराफ यांनी आपल्या गळ्याकडे पाहिलं तेव्हा त्यांना जखम झाल्याचं लक्षात आलं. त्यांच्या गळ्यातून रक्त येत होतं. ‘सीन पूर्ण झाल्यानंतर मी पाहिलं, तर माझ्या गळ्याला कट लागला होता आणि रक्त येत होतं. जर गळ्याची नस कापली गेली असती, तर तिथेच माझं काही खरं नव्हतं. हा प्रसंग मी आयुष्यात कधीच विसरणार नाही.’ असं अशोक सराफ म्हणाले.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language