Hashtagintro

Atharv Sudame : काय मग चला वाडेश्वरला…वैशाली-रुपालीची अथर्व सुदामेने उडवली खिल्ली, FDA च्या कारवाईनंतर पोस्ट केला व्हिडीओ!

Atharv Sudame : काय मग चला वाडेश्वरला…वैशाली-रुपालीची अथर्व सुदामेने उडवली खिल्ली, FDA च्या कारवाईनंतर पोस्ट केला व्हिडीओ!

Pune FDA Vaishali Roopali Restaurant : एफडीए अर्थात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स यांच्यावर कारवाई करताना दिसतायत. अन्न सुरक्षेचे नियम डावलल्यास तसेच नियम मोडल्यास त्यांच्यावर ही कारवाई केली जातेय. पुणे शहरही यातून सुटलेले नाही. दिवळी सणाच्या पार्श्वभूमीवर एफडीएकडून केल्या जाणाऱ्या कारवायांना चांगलाच वेग आलाय. पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रुपाली या दोन्ही हॉटेल्सचा परवाना रद्द करण्यात आलाय. दरम्यान, या कारवाईनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे. अनेक कंन्टेंट क्रिएटर्सने यावर रिल्सही बनवल्या आहेत. पुण्यातील प्रसिद्ध कन्टेंट क्रिएटर अथर्व सुदामे यानेही याच कारवाईवर एक रिल तयार केली असून त्यावर भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातायत.

रुपाली, वैशालीवर काय कारवाई झाली?

वैशाली आणि रुपाली हे दोन्ही हॉटेल्स पुण्यात प्रसिद्ध आहेत. या हॉटेलमधील अन्नपदार्थ चविष्ट आणि रुचकर आहेत, असं नेहमी सांगितलं जातं. परंतु या दोन्ही हॉटेल्समध्ये अन्न सुरक्षेचे नियम पाळण्यात आले नाहीत. हॉटेलमध्ये तपासणी केली असता स्वयंपाकघरातील अस्वच्छता, उघड्यावर अन्नपदार्थांची साठवणूक चुकीच्या पद्धतीने करणे अशा काही त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यानंतर या दोन्ही हॉटेलचे परवाने रद्द करण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Atharva Sudame (@atharvasudame)

अथर्व सुदामेची रिल काय?

अथर्व सुदामे पुणे शहरातील गमती-जमतींवर रिल्स तयार करतो. त्याच्या व्हिडीओंचा मोठा चाहतावर्ग आहे. वैशाली, रुपाली रेस्टॉरंट्सवर कारवाई होताच त्याने त्याच्या सोशल मीडिया खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या पोस्टमध्ये वैशाली आणि रुपाली नावाच्या दोन तरुणी दिसतायत. त्यांना अथर्व सुदामे ‘काय वैशाली, रुपाली काय चाललंय’ असं विचारतोय. त्यावर काही नाही सगळं निवांत असं दोन तरुणी बोलत आहेत. यालाच उत्तर म्हणून चला मग वाडेश्वरला जाऊ, असं मिश्कीलपणे बोलताना दिसतोय. आता वैशाली, रुपाली या दोन्ही हॉटेल्सना काही काम राहिलं नाही. त्यांच्यावर कारवाई झालीय त्यामुळे आता चला वाडेश्वरवर (रेस्टॉरंटला) साऊथ इंडियन पदार्थ खायला जाऊ, असा मिश्कील संदेश त्याला यातून द्यायचा आहे. अथर्वच्या या रिलवर लोकांनी काही कमेंट्सही केल्या आहेत. जे लोक वैशाली, रुपाली हॉटेलचे फॅन आहेत. ते कधीच वाडेश्वरला जाऊन साऊथ इंडियन जेवण करत नाहीत, असं एका युजरने आपल्या कमेंटमध्ये सांगितलंय. पुण्यातील इतरही सोशल मीडिया एन्फ्लुएर्न्सने वैशाली-रुपाली हॉटेलवर रिल्स केल्या आहेत.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language