Hashtagintro

Balasaheb Thackeray: संजय राऊतांचे नाव ऐकताच बाळासाहेब शिव्या द्यायचे; राज ठाकरेंनी सांगितला किस्सा

Balasaheb Thackeray: संजय राऊतांचे नाव ऐकताच बाळासाहेब शिव्या द्यायचे; राज ठाकरेंनी सांगितला किस्सा

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘बोध कीतर्न’ या चित्रपटाचा प्रकाशन सोहळा 31 ऑक्टोबर 2026 रोजी पार पडला. या सोहळ्याला उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. दोघांनी मंचावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, राज ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंना संजय राऊत आवडत नव्हते. संजय राऊत दिसले की ते शिव्या द्यायचे. पण एक दिवस इस बंधे में दम है.. असं म्हणत बाळासाहेबांनी संजय राऊतांचे कौतुक केले होते.

पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राज ठाकरे जुना किस्सा सांगताना म्हणाले की, संजय राऊत यांना लोकप्रभासाठी बाळासाहेब ठाकरेंची मुलाखत घ्यायची होती. त्यासाठी मी बाळासाहेबांशी बोलणी केली. बाळासाहेब सुरुवातीला संजय राऊतांना मुलाखत देण्यास तयार नव्हते. संजय राऊतांनाही बाळासाहेब आवडत नव्हते. बाळासाहेबांनी संजय राऊतांचे नाव ऐकताच शिव्या देण्यास सुरुवात केली. मी दोन-तीन वेळा आग्रह केल्यानंतरच बाळासाहेबांनी मुलाखत देण्यास सहमती दर्शवली.

सामनाचे संपादक कसे झाले?

त्या मुलाखतीत संजय राऊत यांनी असे प्रश्न विचारले की बाळासाहेबांनी त्यांना पुन्हा शिव्या दिल्या. दुसऱ्या दिवशी ही मुलाखत बाळासाहेबांनी दिलेल्या शिव्यांसह छापून आली. त्या घटनेनंतर संजय राऊत बाळासाहेबांना आवडू लागले. त्यानंतर त्यांची ‘दैनिक सामना’च्या संपादकपदी निवड झाली असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, १९८६-८७ च्या सुमारास मी लोकसत्तामध्ये फ्रीलान्स कार्टूनिस्ट म्हणून काम करत होतो आणि संजय राऊत त्या वेळी लोकप्रभामध्ये कार्यरत होते. त्या काळात संजय राऊत यांनी लिहिलेल्या गँगवॉरच्या स्टोरी खूप गाजत होत्या. संजय राऊत आणि चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर हे दोघे तासंतास आमच्या घरी येत आणि आमच्या वडिलांशी गप्पा मारत. आमचे संबंध इतके जुने आहेत, अशी आठवण राज ठाकरेंनी सांगितली.

उद्धव ठाकरेंची मिश्कील टिप्पणी

या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी देखील मिश्कील टिप्पणी केली. ते संजय राऊत यांचे पुस्तक ‘बोध कीतर्न’ विषयी बोलताना मजेशीर अंदाजात म्हणाले की, “हे पहिलंच पुस्तक आहे ज्याला अनुक्रमणिका नाही.”

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language