Hashtagintro

Beed Wild Animal | आष्टी तालुक्यात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरूच: घोड्याचा फडशा; वनविभागाची अवघ्या अर्ध्या तासात धाव!

कडा : आष्टी तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पाण्याच्या आणि चाऱ्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे. नुकतेच देवळाली शिवारात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता पाटसरा गावात दुपारी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात घोडा ठार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनांमुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाटसरा येथे घोड्यावर वन्यप्राण्याने हल्ला केल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाची यंत्रणा तातडीने सक्रिय झाली. अवघ्या अर्ध्या तासात वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे, हल्ला करणारा वन्यप्राणी वाघ आहे की बिबट्या, याबाबत खात्री करण्यासाठी तसेच त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला आहे.

देवळालीतील शेतकऱ्याच्या मृत्यूच्या घटनेनंतर वन्यप्राण्यांच्या वावराचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत पाटसर्‍यातील घटनेने पुन्हा एकदा वन्यप्राण्यांच्या दहशतीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वनविभागाने तातडीने दखल घेतली असली तरी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी परिसरात नियमित गस्त, वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.यावेळी वनरक्षक दत्तात्रय शेळके, बाबासाहेब शिंदे यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

️दुष्काळ, पाणीटंचाई आणि वन्यप्राण्यांचा वाढता वावर अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकरी व ग्रामस्थांना सुरक्षिततेची हमी मिळणार कधी, असा सवाल उपस्थित होत आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language