Hashtagintro

Bhakti Barve : मराठी अभिनेत्रीनं केलेलं मुस्लिम अभिनेत्यासोबत लग्न; नशिबाचे फिरले फासे अन् पतीचा अकाली मृत्यू; पाच वर्षांनी…

Bhakti Barve : मराठी अभिनेत्रीनं केलेलं मुस्लिम अभिनेत्यासोबत लग्न; नशिबाचे फिरले फासे अन् पतीचा अकाली मृत्यू; पाच वर्षांनी…

मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे भक्ती बर्वे. पु. ल. देशपांडे यांच्या ‘ती फुलराणी’ या नाटकातील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. आपल्या दमदार अभिनयानं त्यांनी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. बॉलिवूडचे मुस्लिम–कोकणी अभिनेते शफी इनामदार यांच्यासोबत त्यांची प्रेमकहाणी फुलली, पण नियतीनं या जोडीची साथ फार काळ टिकू दिली नाही.

‘ती फुलराणी’मुळे मिळाली विशेष ओळख

भक्ती बर्वे यांचा जन्म 10 सप्टेंबर 1948 रोजी सांगली येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात बालरंगभूमीपासून केली. पुढे आकाशवाणी आणि दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केलं. मात्र, पु. ल. देशपांडे यांच्या ‘ती फुलराणी’ या नाटकातील भूमिकेमुळे त्या घराघरांत लोकप्रिय झाल्या. या नाटकाचे त्यांनी 1111 हून अधिक प्रयोग केले.

शफी इनामदार यांच्या प्रेमात पडल्या

एका हिंदी चित्रपटाच्या निमित्तानं भक्ती बर्वे यांची अभिनेता शफी इनामदार यांच्याशी ओळख झाली. या ओळखीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शफी इनामदार हे हिंदी चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय अभिनेते होते. ‘ये जो है जिंदगी’ या मालिकेमुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. दोघांचा संसार आनंदात सुरू होता. मात्र, 13 मार्च 1996 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं शफी इनामदार यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानं भक्ती बर्वे यांना मोठा धक्का बसला.

पतीच्या निधनानंतर पाच वर्षांनी काळाचा घाला

पतीच्या निधनानंतरही भक्ती बर्वे यांनी स्वतःला कामात व्यग्र ठेवलं. त्या रंगभूमीवर सक्रिय होत्या. मात्र, 12 फेब्रुवारी 2001 रोजी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरला. वाई येथे कार्यक्रम सादर करून मुंबईला परतत असताना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात भक्ती बर्वे आणि त्यांच्या चालकाचं निधन झालं. वयाच्या अवघ्या 52व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. भक्ती बर्वे यांना त्यांच्या अभिनयासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language