Hashtagintro

Bharat Gogawale : शेत पाणंद रस्त्यांसाठी 116 कोटींचा निधी वितरित; दिवाळीत शेतकऱ्यांना दिलासा

Maharashtra News: मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांसाठी राज्य शासनाकडून 116 कोटी रुपयांचे पूरक कुशल अनुदान वितरित करण्यात आले आहे. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या निर्देशानुसार हा निधी उपलब्ध करून देण्यात आला. दुष्काळी परिस्थिती आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले.
https://www.prahaar.in/2026/11/07/major-increase-in-mpsc-recruitment-examination-now-to-be-held-for-16717-group-c-posts-candidates-get-another-opportunity-to-apply/
मंत्री भरत गोगावले यांचे निधी वितरणाचे निर्देश
शेतकऱ्यांच्या शेतीशी संबंधित अडचणी कमी व्हाव्यात आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी निधी वितरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री भरत गोगावले यांनी संबंधित यंत्रणेला दिले होते. त्यानुसार योजनेअंतर्गत झालेल्या कामांसाठी 116 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना बारमाही रस्त्यांची सुविधा
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत वर्षभर पोहोचता यावे, शेतीची मशागत करणे आणि शेतमालाची वाहतूक करणे सोपे व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाकडून मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना राबवली जात आहे.
पाणंद रस्त्यांमुळे शेतमाल बाजारपेठेत पोहोचवणे, शेतीची दैनंदिन कामे करणे आणि शेतापर्यंत जाणे सुलभ होते. वितरित केलेल्या निधीमुळे योजनेतील उर्वरित कामांनाही गती मिळण्यास मदत होणार आहे.

निधी उपलब्ध होताच वितरण करणार
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहताना ग्रामीण भागातील विकासकामेही थांबू नयेत, या भूमिकेतून निधी वितरण करण्यात आल्याचे मंत्री गोगावले यांनी सांगितले. यापुढेही निधी उपलब्ध होताच तो तातडीने वितरित केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना शुभेच्छाही दिल्या.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language