Hashtagintro

Bharat Gogawale : ७० हजार झाडे तोडली तर ७५ हजार झाडे लावण्याची आमची तयारी

अलिबाग : ७० हजार झाडे तोडली तर आम्ही ७५ हजार झाडे लावण्यास तयार आहोत, असे खळबळजनक वक्तव्य रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी गुरुवारी अलिबागमध्ये पत्रकार परिषदेत केले. या विधानाने पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे. झाडे तोडून त्याबदल्यात काही हजार झाडे लावण्याचा हिशेब मांडणे सोपे असले, तरी निसर्गाची झालेली अपरिमित हानी भरून काढणार कोण, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

अलिबाग येथे पत्रकार परिषदेत टोरंट वृक्षतोड प्रकरणावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पालकमंत्री भरत गोगावले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जिल्ह्यात उद्योग आले नाहीत, धरणे झाली नाहीत, तर मुलांना नोकऱ्या कशा मिळणार, असा सवाल पालकमंत्र्यांनी उपस्थित केला.

तसेच ७० हजार झाडे तोडली तर आम्ही ७५ हजार झाडे लावण्यास तयार आहोत, असेही वक्तव्य केले. जिल्ह्याची ग्रोथ वाढतेय, उद्योगांना पाणी आणि वीज दिली नाही तर नवीन उद्योग कसे येणार, असा युक्तिवाद पालकमंत्र्यांनी केला.

कर्जत टोरंट वृक्षतोड प्रकरणावरून‌ जनतेत असंतोष पसरला आहे. जनतेकडून वृक्षतोड विरोधी प्रतिक्रिया उमटत आहेत. असे असताना पालकमंत्री भरत गोगावले यांनी एकप्रकारे या वृक्षतोडीचे समर्थन केले असल्याचे दिसून येते. ७० हजार प्रौढ झाडे तोडून ७५ हजार नवीन रोपे लावली, तरी या दोन्हींची पर्यावरणीय किंमत समान असू शकते का? जुन्या वृक्षांनी वर्षानुवर्षे निर्माण केलेली जैवविविधता, पक्ष्यांचे अधिवास, सावली, भूजल संवर्धन आणि हवेचे शुद्धीकरण यांची भरपाई केवळ नवीन रोपे लावून तातडीने होऊ शकते का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language