भुवनेश्वर कुमारने १४३० दिवसांनंतर भारतासाठी गोलंदाजी केली आणि आपल्या पहिल्या दोन चेंडूंवर एक विशेष विक्रम प्रस्थापित केला.
भारतीय संघात पुनरागमन करताना भुवनेश्वर कुमारने एक विशेष विक्रम प्रस्थापित केला. या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने न्यूझीलंडविरुद्ध पहिले दोन निर्धाव चेंडू टाकताच विश्वविक्रम मोडला
टी२० आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम भुवनेश्वर कुमारच्या नावावर आहे. भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ८९३ निर्धाव चेंडू टाकले आहेत.
भुवनेश्वर कुमार निर्धाव चेंडू टाकण्यात माहीर आहे. या उजव्या हाताच्या गोलंदाजाच्या नावावर आयपीएलमध्येही सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम आहे. भुवीने आयपीएलमध्ये १९४४ निर्धाव चेंडू टाकले आहेत
क्राइस्टचर्च टी२० सामना भुवनेश्वर कुमारसाठी खूप खास आहे. २०२२ साली या खेळाडूने न्यूझीलंडविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळला होता आणि आता त्याने याच संघाविरुद्ध पुनरागमन केले आहे.
Source: TV9 Marathi Sports





