Hashtagintro

BMC Bond : म्युनिसिपल बाँडची प्रक्रिया जोरात.. कागदपत्रांची मराठीतून इंग्रजीत भाषांतरासाठी नेमली संस्था

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने वितरीत करण्यात येणाऱ्या महानगरपालिका रोखे अर्थात म्युनिसिपल बाँड संदर्भातील कागदपत्रांचे आणि अभिलेखांचे मराठी भाषेतून इंग्रजी भाषेत भाषांतर करण्यासाठी चक्क अडीच लाख रुपये मोजण्यात आले आहे. हे मराठीतून इंग्रजी भाषेत भाषांतर करण्यासाठी एडी कोऑथर्स डॉक्युमेंटेशन सर्व्हिसेस या कंपनीची निवड करण्यात आली असून त्यांनी प्रति शब्द १ रुपये ६० पैसे मोजले असून दीड लाखांहून अधिक शब्दांचे भाषांतर करण्यासाठी जीएसटी वगळता २.४० लाख रुपये मोजले जाणार आहे.
मुंबई महानगरपालिकेमार्फत महानगरपालिका रोखे (म्युनिसिपल बाँड) वितरीत करण्याच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या विविध दस्तऐवजांचे व संबंधित अभिलेखांचे मराठी भाषेतून इंग्रजी भाषेत भाषांतर करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या संदर्भातील कागदपत्रांचे अचूक, सुसंगत व आशयपूर्ण इंग्रजी अनुवाद उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अनुभवी संस्थेची अनुवादक म्हणून नियुक्ती करणे आवश्यक आहे. सदर या कागदपत्रांचे स्वरूप प्रशासकीय तथा कायदेशीर असल्याने म्युनिसिपल बाँड उभारण्याच्या अनुषंगाने सेबीकडे जी कागदपत्रे तसेच ठराव अशी जी कागदपत्रे सादर केली जातात, ती इंग्रजी भाषेमध्ये सादर करणे बंधनकारक आहे. म्युनिसिपल बाँड करण्यासंदर्भात होणाऱ्या विविध आढावा बैठकीमध्ये प्राप्त निर्देशांनुसार तसेच या प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मर्चंड बँकर्स सोबत झालेल्या सखोल चर्चामधून सूचित करण्यात आल्यानुसार महाराष्ट्रात ज्या ज्या महानगरपालिकांनी आजपर्यंत महानगरपालिका रोखे म्हणजे बाँड उभारले आहेत. त्यात पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक व नागपूर आदी महापालिकांचा समावेश आहे. या महापालिकांच्या संबंधित कागदपत्रांच्या अनुवादाच्या कामाचा अनुभव एडी कोऑथर्स डॉक्युमेंटेशन सर्व्हिसेस यांना आहे. त्याअनुषंगाने,या कंपनीची निवड करण्यात आली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/08/mumbai-diwali-noise-pollution-drops-compared-to-past-20-years-but-cracker-rules-violation-continues/
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महानगरपालिकेच्या या कामाचे स्वरूप व मुंबई महानगरपालिका रोखे वितरीत करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या सादर करावयाच्या सर्व कागदपत्रांचे अचूक, सुसंगत आणि दर्जेदार भाषांतर करण्याची आवश्यकता विचारात घेता तसेच,एडी फोऑनर्स डॉक्युमेंटेशन सर्व्हिसेस या संस्थेने यापूर्वी पुणे, पिंपरी-बिंचवड, नाशिक व नागपूर महानगरपालिकांकरिता रोखे वितरीत करण्या संदर्भात केलेल्या भाषांतराच्या कामाचा व्यापक अनुभव पाहता एडी कौआँथर्स डॉक्युमेंटेशन सर्व्हिसेस या संस्थेची अनुवादक म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. या कामासाठी अंदाजे १,५०,००० शब्दांचे भाषांतर अपेक्षित असून, १.६० रुपये प्रति शब्द या दरानुसार २,८३,२०० रुपये इतका खर्च प्रस्तावित असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language