Hashtagintro

BMC Hospital : महापालिकेचे भगवती रुग्णालय पी.पी.पी तत्वावर… आमदारांनी नागरिकांसह घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईची वाढती लोकसंख्या आणि महापालिका रुग्णालयांवरील वाढता रुग्णसेवेचा ताण लक्षात घेता भगवतीसारखे ४९० खाटांचे अत्याधुनिक मल्टी-स्पेशालिटी रुग्णालय सुरू होणे ही काळाची गरज आहे. त्यानुसार खासदार तथा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार मनिषा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बोरिवली पश्चिम येथील भगवती महानगरपालिका रुग्णालयाची पाहणी करण्यात आली. यावेळी नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती तसेच स्थानिक नागरिकांच्या शंका व अपेक्षा समजून घेण्यात आल्या.
मुंबई महानगरपालिकेने ४९० खाटांच्या या नव्या अत्याधुनिक मल्टी-स्पेशालिटी भगवती रुग्णालयाचे संचालन ३० वर्षांसाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पी.पी. पी) तत्त्वावर खासगी संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे.

भगवती रुग्णालय हे खासगी सहभाग तत्वावर अर्थात पी पी पी अंतर्गत सुरू करण्यात असल्याने नव्या अत्याधुनिक मल्टी-स्पेशालिटी प्रकल्पाची वस्तुस्थिती आमदार मनिषा चौधरी यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी महापालिका सभागृह नेते गणेश खणकर , आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे, नगरसेवक जितेंद्र पटेल, माजी नगरसेवक जगदीश ओझा, नगरसेविका योगिता पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थानिक आमदार मनिषा चौधरी यांनी या प्रकल्पाच्या अनुषंगाने स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकारी व प्रतिनिधींना सोबत घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णालयात उपलब्ध होणाऱ्या वैद्यकीय सुविधा, उपचार व्यवस्था, प्रकल्पाचे स्वरूप आणि सर्वसामान्य रुग्णांना मिळणाऱ्या सेवांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली. नागरिकांच्या प्रश्नांना आणि शंकांना योग्य उत्तरे मिळावीत, तसेच प्रकल्पाबाबत पारदर्शकता राहावी, यासाठी ही पाहणी महत्त्वपूर्ण ठरली. यावेळी नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले.

मुंबईची वाढती लोकसंख्या आणि महापालिका रुग्णालयांवरील वाढता रुग्णसेवेचा ताण लक्षात घेता भगवतीसारखे ४९० खाटांचे अत्याधुनिक मल्टी-स्पेशालिटी रुग्णालय सुरू होणे ही काळाची गरज आहे. बोरिवलीसह आसपासच्या परिसरातील नागरिकांना आधुनिक वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर आणि दर्जेदार उपचार उपलब्ध होण्यास या रुग्णालयामुळे मोठी मदत होणार आहे. महापालिकेच्या आरोग्यसेवेची क्षमता वाढविण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात उत्तम उपचार मिळणे आवश्यक आहे. या प्रकल्पाचा लाभ सामान्य रुग्णांपर्यंत पोहोचावा आणि नागरिकांच्या आरोग्यविषयक अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, यासाठी आमदार मनिषा चौधरी सातत्याने पाठपुरावा करीत असून, या पाहणीच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला, असे सभागृह नेते गणेश खणकर आणि आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी सांगितले.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language