Hashtagintro

Body Language Secrets : समोरची व्यक्ती खोटं बोलतेय कसं ओळखायचं ?

Body Language Secrets

एफबीआयचं (FBI) प्रशिक्षण घेतलेले प्रसिद्ध बॉडी लँग्वेज तज्ज्ञ जुआन मॅन्युएल गार्शिया लोपेझ यांनी खोटेपणा पकडण्याची एक एकदम भारी ट्रिक सांगितली आहे.

Body Language Secrets

लोपेझ यांच्या मते, आपण ज्याचा कधी विचारही केला नसेल, शरीराच्या अशा एका अंगावरून समोरची व्यक्ती सत्य बोलतेय की थापा मारतेय, हे सहज समजू शकतं.

Body Language Secrets

आपण सहसा बोलताना लोकांचे चेहरे किंवा हात पाहतो, पण माणसाचे ‘पाय’ खोटेपणा उघड करण्यासाठी सर्वात मोठी भूमिका बजावतात!

Body Language Secrets

जेव्हा एखादी व्यक्ती अचानक पूर्णपणे गप्पगार किंवा एकदम ताठ उभी राहते, तेव्हा सावध व्हा; कारण ही भीतीची किंवा काहीतरी लपवण्याची मुख्य खूण असते.

Body Language Secrets

एखादी व्यक्ती खोटं बोलत असताना किंवा भीतीच्या छायेत असताना चेहरा लाल होणे, बाहुल्या विस्तारणे किंवा नाकपुड्या फुगणे या गोष्टींवर अजिबात नियंत्रण राहत नाही.

Body Language Secrets

कोणी वरवर ‘मी खूप आनंदी आहे’ असं म्हणत असेल, पण त्यांचं शरीर मात्र आखडलेला पवित्रा घेत असेल, समजून जा की शब्दांत आणि बॉडी लँग्वेजमध्ये विरोधाभास आहे.

Body Language Secrets

संवाद साधताना व्यक्तीच्या पायाची पावलं किंवा बोटे दरवाज्याकडे निर्देश करत असतील, समजून घ्या की भीती, घाईमुळे त्यांना तिथून तातडीने बाहेर पडायचं आहे!

Body Language Secrets

काही लोक इतके धूर्त असतात की, ते समोरच्याला गंडवण्यासाठी खोट्या शारीरिक हालचाली किंवा कृत्रिम हावभाव करून तुमच्या मेंदूला सहज चकवा देऊ शकतात.

Body Language Secrets

त्यामुळे पुढच्या वेळी समोरची व्यक्ती थापा मारतेय असा संशय आल्यास, फक्त चेहऱ्याकडेच नाही तर त्यांच्या पायांच्या हालचालींवरही आवर्जून लक्ष ठेवा!

येथे क्‍लिक करा.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language