
Celebrity Affairs: झगमगत्या विश्वात अशा काही ‘लव्हस्टोरी’ होऊन गेल्या त्याची चर्चा आजही चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर रंगलेली असते. 90 दशकातील सेलिब्रिटी आज त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहे. पण भूतकाळात घडलेल्या गोष्टी कधीच पुसता येत नाहीत. बॉलिवूडमध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत, ज्यांचं नाव अनेकांसोबत जोडण्यात आलं. यामध्ये अभिनेते मिथुन चक्रवर्ती, अभिनेता संजय दत्त, अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी यांची देखील नावं आहे. एवढंच नाही तर, या यादीमध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री करिष्मा कपूर देखील सामिल आहे. यांच्या खासगी आयुष्याबद्दल आजही चर्चा रंगलेल्या असतात, पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक लॉरेंस डिसूझा यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अफेअरवर मोठं वक्तव्य केलं आहे.
मिथुन चक्रवर्ती आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी…
दिग्दर्शक लॉरेंस डिसूझा यांनी नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी यांच्या अफेअरबद्दल मोठं वक्तव्य केलं. ‘गैर कानूनी’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान, मिथून दा आणि श्रीदेवी यांच्यामध्ये प्रेम बहरलं… पण तेव्हा अभिनेते विवाहित होते. दिग्दर्शक म्हणाले, ‘सेटवर प्रत्येक 15 मिनिटांनंतर मिथुन यांचा फोन यायचा आणि श्रीदेवी सतत फोन उचलण्यासाठी पळत जायच्या.. त्यानंतर शॉट द्यायती आणि 10 – 15 मिनिटांनी पु्न्हा फोनवर बोलण्यासाठी जायची.’ मिथुन दा देखील सेटवर आलेल, सर्वांसमोर त्यांचं अफेअर सुरु होतं.
शूटिंग संपल्यानंतरही करिश्माची वाट पाहायचा अजय देवगण
अजय देवगण आणि करिश्मा कपूर ही 90 च्या दशकातील सर्वात चर्चित ऑन-स्क्रीन जोड्यांपैकी एक होती. दोघांनी ‘जिगर’, ‘संग्राम’ आणि ‘सुहाग’ यांसारख्या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. यानंतर त्यांच्या अफेअरच्या अफवाही उडाल्या होत्या. यावर लॉरेन्स डिसूझा यांनी ‘संग्राम’च्या सेटवरील एक किस्सा सांगताना म्हटले की, “‘संग्राम’च्या शूटिंगदरम्यान अजय देवगण सेटवर येऊन बसायचा. पॅक-अप झाल्यानंतरही तो करिश्मासाठी थांबून राहायचा.”
संजय दत्त-माधुरीच्या नात्यावर काय म्हणाले दिग्दर्शक?
संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांचं नातं देखील खूप चर्चेत राहिलं. आज देखील दोघांच्या नात्याची चर्चा सुरु असते. दोघांनी लॉरेन्स डिसूझा यांच्या ‘साजन’ या सिनेमात एकत्र काम केलं होतं. सिनेमाच्या सेटवरील आठवण सांगताना ते म्हणाले, “संजय दत्त सेटवर माधुरीचे क्लोज-अप शॉट्स पाहण्यासाठी यायचा.”, सध्या सर्वत्र सेलिब्रिटींच्या अफेअरची चर्चा रंगली आहे.
Source: TV9 Marathi Entertainment
