Hashtagintro

Cristiano Ronaldo ला मोठा धक्का? 30 दिवसांची बंदी आणि दंडाच्या बातमीने फुटबॉल विश्वात चर्चा, नेमकं प्रकरण काय?

लिस्बन (पोर्तुगाल): जागतिक फुटबॉल विश्वातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. पोर्तुगीज फुटबॉल महासंघाने संघाचा कर्णधार आणि स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोवर 30 दिवसांची बंदी घातली असून त्याला 255 युरोचा दंडही ठोठावला आहे. अलीकडील आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या कालावधीत (इंटरनॅशनल ब्रेक) पोर्तुगालच्या प्रशिक्षण शिबिरातून अचानक बाहेर पडल्यामुळे महासंघाने ही शिस्तभंगाची कठोर कारवाई केली आहे. या निर्णयामुळे फुटबॉल वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

प्रशिक्षक आणि रोनाल्डोमधील वादाचे नेमकं कारण काय?
सप्टेंबरच्या उत्तरार्धात नॉर्वेविरुद्धच्या 2-1 अशा विजयाच्या सामन्यात रोनाल्डोला राखीव फुटबॉलपटूंच्या बाकावर बसावे लागले होते. त्यानंतर त्याचे पोर्तुगालचे प्रशिक्षक जॉर्ज जीझस यांच्यासोबत खटके उडाले. आपल्याला 30 मिनिटे खेळण्याची खात्री देऊनही मैदानात न उतरवल्यामुळे रोनाल्डो नाराज झाला होता. प्रशिक्षकाने समस्या गांभीर्याने घेतली नाही आणि पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देण्याचे आश्वासन पाळले नाही, असा आरोप रोनाल्डोने केला. अखेरीस डेन्मार्कविरुद्धच्या सामन्यापूर्वी तणाव वाढल्याने त्याने शिबिर सोडले.
https://www.prahaar.in/2026/10/20/wpl-2027-bids-to-be-placed-for-146-players-but-only-27-will-see-their-fortunes-shine-auction-on-october-28/
रोनाल्डोची कबुली आणि पुढची कारवाई
अल-नासर क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोने आपल्या चुकीची जाहीर माफी मागितली आणि स्वतःहून योग्य शिक्षेची मागणी केली. एक आदर्श खेळाडू म्हणून आपल्या कृतींचे मूल्यमापन झाले पाहिजे, असे त्याने मान्य केले. महासंघाने 30 सप्टेंबरपासून ही निलंबनाची कारवाई लागू केल्यामुळे, रोनाल्डो 14 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पोर्तुगालच्या आगामी आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी पुन्हा संघात परतण्यास पात्र ठरणार आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language