Hashtagintro

Dattatreya Bharane | नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान लवकरच

नाशिक : राज्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान लवकरच दिले जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत या अनुदानाची तरतूद करण्यात आली असून, याचा लाभ राज्यातील सुमारे २० लाख नियमित कर्जदार शेतकऱ्यांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

१९ व्या आंतरराष्ट्रीय ‘कृषिथॉन २०२६’ प्रदर्शनाचे उद्‌घाटन गुरुवारी (दि. २६) कृषिमंत्री भरणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मंत्री भरणे म्हणाले की, राज्यातील सुमारे ३० लाख शेतकऱ्यांचे कर्ज २ लाख रुपयांच्या आतील आहे, तर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २० लाखांच्या घरात आहे. प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील तरतुदीनुसार त्यांना प्रोत्साहन अनुदान वितरण करण्याबाबत शासन स्तरावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

२४ तास वीज सध्या अशक्य

शेतीच्या वीजपुरवठ्याबाबत बोलताना भरणे म्हणाले की, शेतकऱ्यांना २४ तास वीज देणे सध्या शक्य नसले, तरी कोणत्याही शेतकऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी महावितरणने घ्यावी, अशा सूचना त्‍यांना देण्यात आल्या आहेत.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language