Hashtagintro

Delimitation Bill | परिसीमन विधेयकास शरद पवार राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा!

मुंबई : संसदेत सत्ताधारी युतीने परिसीमन विधेयक मांडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील जागा दुपटीने वाढत असतील तर परिसीमन विधेयकासमवेत असणे फायद्याचे ठरेल, असे मत खासदारांशी चर्चा करताना अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले. खासदारांना हे धोरण मान्य आहे, मात्र ८ पैकी बहुतांश खासदार भाजपविरोधात निवडून आले असल्याने रालोआसोबत जाणे फायद्याचे नाही, असे मत त्यांनी नोंदविले.

भाजपच्या नेतृत्वातील युतीत राज्यात चौथा पक्ष म्हणून स्थान मिळवल्यास केंद्रात एखादे मंत्रिपद वाट्याला येईल. ते सुप्रिया सुळे यांना मिळेल. मात्र धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचा आग्रह धरणाऱ्या शरद पवार यांच्या कन्येने मंत्रिपद घेणे योग्य आहे काय, याचाही विचार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो आहे. आठ खासदारांच्या संख्याबळाच्या आधारावर दोन मंत्रिपदे मिळाली तरी ती फायद्याची नाहीत, असे काहींचे मत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांचे खासदार पुत्र पार्थ यांचा विलीनीकरणास विरोध आहे. शिवाय सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद मिळणार असेल तर ते पार्थ यांनाही मिळायला हवे, असा या दोघांचा आग्रह आहे.

महाराष्ट्रात १० आमदार असलेल्या शरद पवार गटाला ऊर्जा आणि गृहनिर्माण खाते हवे आहे. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत. अजित पवार गटाचा या प्रस्तावाला विरोध आहे. शिंदे शिवसेनेला गृहनिर्माण खाते राष्ट्रवादीला द्यायची इच्छा नाही. राज्यातील नेतृत्वाने मंत्रिपदे देण्यास अनुकूलता दाखवलेली नाही. त्यामुळेच परिसीमन विधेयक महिला आरक्षणाला वाट करून देणार असल्याने बाहेरून पाठिंबा द्यावा, असे सध्याचे मत आहे. अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना शरद पवार समवेत असावेत, असे वाटत असले तरी पार्थ यांचा या हालचालीस ठाम विरोध आहे.

परिसीमन विधेयक नक्की केव्हा?

संसदेचे संस्थगित अधिवेशन केव्हाही सुरू होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आठ आणि डीएमकेचे २२ खासदार या विधेयकाला अनुकूल असतील तर ते पारित होऊ शकेल का? यापूर्वीही परिसीमन झाले होते, मतदारसंख्या वाढून महिलांना आरक्षण मिळायला हवे याला आमचा पाठिंबा आहे. मात्र सरकारमध्ये जाण्याचा विचार नाही, असे पक्षाच्या एका बड्या नेत्याने सांगितले.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language