Hashtagintro

Devendra Fadnavis |भर उन्हात देवाभाऊ शेतात रात्री शेतकऱ्याच्या घरी मुक्काम, रविवारी सकाळी थेट बांधावर

नागपूर : उन्हामुळे जीवाची काहिली होत असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर उन्हात शेतात जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली आणि आपण केवळ मंत्रालयात बसणारे मुख्यमंत्री नाही, तर अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, असा विश्वास त्यांनी शेतात जाऊन दिला. शनिवारी रात्री त्यांनी लोहारी सांगवा येथे शेतकऱ्याच्या घरी जेवण करून मुक्काम केला आणि रविवारी सकाळी थेट बांधावर जाऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी संकटात असल्याने त्यांना धीर देण्यासाठी दीपावली शेतकऱ्याच्या घरी जाऊन साजरी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यानुसार ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळीच ते नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सांवगा येथे पोहोचले. रात्री शेतकरी कुटुंबीयांसह भोजन करून ते भजनात सहभागी झाले. ८ नोव्हेंबरला सकाळी त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन, सरकार आपल्या पाठीशी आहे, असा दिलासा शेतकऱ्यांना दिला. दिलीप सरोदे या शेतकऱ्याच्या शेतात सोनेगाव रिठी येथे त्यांनी भेट दिली. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जी गावे मदत करतील त्यांना संपूर्ण सहकार्य करण्यात येईल. सरपंचांनी मांडलेल्या सर्व सूचना व जलसंधारणाच्या प्रश्नासंदर्भात प्राधान्याने कामे सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

जलजीवनच्या कामांना तातडीने निधी

जलजीवन मिशनच्या कामांबाबत मुख्यमंत्री म्हणाले, पुरेसे पैसे न मिळाल्याने काही कामे अपूर्ण आहेत, मात्र आता ती प्राधान्याने पूर्ण केली जात आहेत. जेथील कामे ७५ टक्यांच्यावर पूर्ण झाली आहेत, तेथे तातडीने निधी उपलब्ध करून ती कामे पूर्ण केली जातील. शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांकडून होत असलेले नुकसान गंभीर आहे. त्यासाठी तार कुंपण योजना अधिक व्यापक करण्यात येईल. जंगलाला लागून असलेल्या शेतांना यात विशेष प्राधान्य देण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

आजवर कधीच मुख्यमंत्री पाहिले नव्हते

आजवर एकाही मुख्यमंत्र्यांना आम्ही प्रत्यक्ष पाहिले नव्हते; मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या गावात मुक्काम करून आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का दिला, अशी भावना लोहारी सांवगा येथील महिलांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री आपल्या छोट्याशा गावात आले आणि रात्रभर येथेच थांबले याचा झालेला आनंद या महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

शेतकऱ्याच्या घरी रमले मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरखेड तालुक्यातील लोहारी सांगवा या गावात शेतकऱ्यांच्या घरी शनिवारी रात्री मुक्काम करीत गावकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी लहान बाळाला मांडीवर घेत शेतकऱ्यांच्या व्यथा, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या, त्यांना धीर दिला. रामभाऊ बालपांडे यांच्या घरी कुटुंबीयांसमवेत दीपावली साजरी करीत मुख्यमंत्र्यांनी आपलेपणाचा नवा अध्याय लिहिला.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language