बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. दिवाळीपूर्वी तिचा एक व्हिडिओ बीएमसीने शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिने दिवाळी कशी साजरी करावी असा संदेश दिला होता.
हे प्रकरण खूपच गाजले होते. राजकारणी मंडळीनी एका मुस्लिम अभिनेत्रीने शिकवू नये की दिवाळी कशी साजरी करावी अस म्हणत तिला सुनावलं होत. आता हे प्रकरण शांत झाले आहेत तेवढ्यातच दियाने एक पोस्ट शेअर केली आहे.ट
दियाने ही पोस्ट बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकीसंदर्भात शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने नवाजुद्दी सिद्दकीसोबत काम करताना आलेल्या वाईट अनुभवाबद्दल ती स्पष्टच म्हणाली आहे.
दिया पोस्ट करत म्हणाली की, “हे एक वाईट स्वप्नासारखे आहे, त्याच्याकडे बोलण्याची शिस्त नाहीये. आणि त्याला भलताच माज आहे. बिल्कुल न पटणारे व्यक्तीमत्त्व आहे तो.
दियाच्या या पोस्टचा अंदाज काही लोक PR स्टंट असल्याचे म्हटले जात आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे ते लवकरच समजेल अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.
Source: TV9 Marathi Entertainment





