
बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाच्या दिवाळी जनजागृती व्हिडिओवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. पर्यावरणपूरक दिवाळी कशी साजरी करावी, यासंदर्भात क्रिकेटपटू आणि सिनेकलाकारांच्या सहाय्याने एक जनजागृती मोहिम सुरु आहे. अनेक सेलिब्रिटींचे यासंदर्भातील व्हिडीओ पालिकेकडून पोस्ट करण्यात आले. त्यामध्ये अभिनेत्री दिया मिर्झा हिचा देखील व्हिडीओ मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पोस्ट करण्यात आलेला. मात्र मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी एक्सवर पोस्ट करत, दिवाळी कशी साजरी करावी याबद्दल दिया मिर्झाकडून धडे घेण्याची गरज नाही. आमच्या परंपरा, संस्कृती खोलवर रुजलेल्या आहे, असं ट्विट अमित साटम यांनी केलं. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी सुद्धा दिया मिर्झा विरोधात भूमिका घेतली. आमचा दिया मिर्झाला कायम विरोध असेल. दिया मिर्झान नेहमी हिंदूविरोध भूमिका घेते, असे तावडे म्हणाल्यात.
दिया मिर्झाच्या या व्हिडिओवरुन राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता इमरान खानची गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टनने सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया दिली आहे. दिया मिर्झाने व्हिडिओमधून फटाकेविरोधी संदेश दिला होता. “आपली परंपरा ही आपली संस्कृती आहे, या लाइनवर दियाला बोलायला लावून आपण तिला शांत केलं. दिया काही चुकीचं बोलली नव्हती. तिने फक्त एवढीच विनंती केली होती की, हवा आणि ध्वनी प्रदूषण कमी व्हावं यासाठी कमी फटाके फोडा असं तिने आवाहन केलेलं” असं लेखा म्हणाली. “ती काय म्हणालेली? दिवाळीत फोडा फटाके पण कमी फोडा. पर्यावरणाबद्दल जास्त जागरुक राहा, विचार करा इतकं साध आवाहन तिने केलेलं. मग तिला का शांत केलं?” असा प्रश्न लेखा वॉशिंग्टनने विचारलाय.
Imran’s gf Lekha reacts to Dia Mirza controversy, but later deletes it https://t.co/XU0RVWLjCS
— Saurabh Chaudhary (@100raabhh) November 2, 2026
दिया मिर्झा काय बोलली?
मुंबई महानगरपालिकेच्या प्रदूषण विरोधी दिवाळी जगजागृती मोहिमचा भाग म्हणून दिया मिर्झाने व्हिडिओ रेकॉर्ड केलेला. तिने मुंबईकरांना इको फ्रेंडली दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलेलं. फटाके फोडून हवा आणि ध्वनी प्रदूषण टाळा असं तिने म्हटलेलं. महापालिकेने दियाचा व्हिडिओ काढून टाकल्यानंतर दिया मिर्झा या वादावर बोलली आहे. “अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणून आपण दिवाळी साजरी करतो. लोकांमध्ये जगजागृतीच्या दृष्टीने तो व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आलेला. अजून चांगल्या पद्धतीने सेलिब्रेशनचा उद्देश त्यामागे होता. हवा प्रदूषण हा लोकांच्या आरोग्याशी संबंधित विषय आहे” असं दिया मिर्झा म्हणाली.
Source: TV9 Marathi Entertainment
