Hashtagintro

Diljit Dosanjh : दिल्लीतील भर कॉन्सर्टमध्ये दिलजीत दोसांझने CRPF महिलेसोबत केले असे काही ….. व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले

Diljit Dosanjh : दिल्लीतील भर कॉन्सर्टमध्ये दिलजीत दोसांझने CRPF महिलेसोबत केले असे काही ….. व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले

गाण्यांच्या तालावर हजारो चाहत्यांना थिरकवणारा दिलजीत दोसांझ दिल्लीतील कॉन्सर्टमध्ये मात्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. यावेळी त्याने कोणते गाणे गायले किंवा स्टेजवर कोणता खास परफॉर्मन्स दिला,यापेक्षा त्याने एका महिला CRPF सोबत असं काही केलंय ज्यामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कॉन्सर्ट सुरू असतानाच दिलजीतने अचानक आपला परफॉर्न्मस थांबवला आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या CRPF महिलेला स्टेजवर बोलावले. तिच्या सोबत असे काही केले आहे. ज्यामुळे बघणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दिलजीतचा दिल्लीतील हा कार्यक्रम 30 ऑक्टोबर रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पार पडला. त्याच्या ‘ऑरा इंडिया टूर’ ची ही पहिली मैफल होती. कार्यक्रमादरम्यान दिलजीतने उपस्थित प्रेक्षकांची सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं. दिलजीत म्हणाला ” तुम्ही जर नसता तर आम्हाला सुरक्षित वाटलं नसतं” अशा शब्दात त्याने सुरक्षा अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि त्यांना सॅल्यूट देखील केला.

यानंतर त्याने एका महिला CRPF अधिकाऱ्याला मंचावर बोलावलं. तिला पाहताच दिलजीत म्हणाला, ‘काही क्षणासाठी मला माझ्या आईची आठवण झाली. दिलजीतने महिला अधिकारीशी बोलताना सांगितले की तो वर्षातून एक – दोनवेळाचं आपल्या आईला भेटतो. त्या कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी आईचा फोन आला होता. तिने त्याला स्वत : ची काळजी घेण्यास सांगितली होती. त्या महिला अधिकाऱ्याला पाहताच त्याला आपली आईचं पाठीशी उभी आहे.असं दिलजीतने सांगितलं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by DILJIT DOSANJH (@diljitdosanjh)

 

 

हे सगळं बोलत असतानाच दिलजीतने त्यांना मायेची मिठी मारली आणि पुन्हा एकदा सॅल्यूट केला. एवढंच नाही तर तिच्यासाठी गाणंही गायलं आणि एक भेटवस्तू दिली. या क्षणाचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यासोबतच त्याने कॅप्शनमध्ये दिल्लीच्या फॅन्सचे, CRPF, दिल्ली पोलिस आणि कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार मानले आहेत.

दिलजीतचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ खाली अनेक सिंगर्सच्याही कमेंट्स पाहायला मिळत आहेत. त्याने या कृत्याने त्याच्या चाहत्यांचे मन जिंकले आहे.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language