Hashtagintro

Divorce: वयाच्या 18 व्या वर्षी पहिलं लग्न, तर 43 व्या वर्ष दुसरं… प्रसिद्ध गायिकेचा दुसरा संसारही मोडला, ‘ती’ पोस्ट चर्तेत

Divorce: वयाच्या 18 व्या वर्षी पहिलं लग्न, तर 43 व्या वर्ष दुसरं… प्रसिद्ध गायिकेचा दुसरा संसारही मोडला, ‘ती’ पोस्ट चर्तेत

Kanika Kapoor Divorce: ‘बेबी डॉल’ आणि ‘चिट्टियां कलाइयां’ यांसारख्या हिट गाण्यांना आवाज देणारी आणि सर्वांना ताल धरायला लावणारी बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूर. तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचं दुसरा संसार देखील आता मोडण्याच्या मार्गावर आहे. कनिका हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, कनिकाचं पहिलं लग्न 18 व्या वर्षी झालं होतं. पहिल्या लग्नापासून गायिकेला तीन मुलं देखील आहे. फार कनिकाचा पहिला संसार फार काळ टिकला नाही. त्यानंतर कनिकाने सिंगल मदर म्हणून मुलांचा सांभाळ केला. तर वयाच्या 43 व्याज कनिाकने दुसऱ्या संसाराला सुरुवात केली. पण लग्नाच्या 4 वर्षांनी तिच्या संसार विघ्न आल्याची माहिती समोर येत आहे.

खुद्द कनिकाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. कनिका हिने मंगळवारी सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत दुसऱ्या नवऱ्यापासून विभक्त होत असल्याची माहिती दिली आहे. पण तिने इतका मोठा निर्णय का घेतला… याबद्दल काहीही सांगितलं नाही. कनिका पोस्ट करत म्हणते, ‘माझे प्रिय मित्रमंडळी आणि कुटुंबि… खोल विचार केल्यानंतर मी आणि माझ्या पतीने आमचे मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे…’

पुढे कनिका म्हणते, ‘आम्ही जो वेळ एकमेकांसोबत घालवला आहे, त्यासाठी मी आभारी आहे आणि त्याला भविष्यासाठी शुभेच्छा देते… मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करतेय की, आमच्या गोपनियतेचा सन्मान आणि आदर करा..’, सध्या कनिकाची पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, कनिका हिच्या दुसऱ्या नवऱ्याचं नाव हाथीरमानी असं आहे. पण कनिका आणि गौतम का विभक्त होत आहेत. याबद्दल कोणतंच कारण समोर आलं नाही.

कनिका हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, 2021 मध्ये गौतम याने कनिका हिला प्रपोज केलं होतं. त्यानंतर अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. अखेर 20 मे 2022 मध्ये लंडन येथे दोघांनी लग्न केलं. कनिका हिचे तीन मुलं देखील आई दुसऱ्या लग्नात सहभागी झालेले. मुलगा युवराज हा तर, आईला दुसऱ्या लग्नासाठी मंडपात घेऊन आलेला. तर मुला आयाना आणि समारा देखील कनिकाच्या बाजूला उभ्या होत्या.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language