Hashtagintro

Diwali 2026 | नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन रविवारी एकाच दिवशी

पुणे : दीपावलीचा सण यंदा तिथींच्या संयोगामुळे काहीसा वेगळा असेल. नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी म्हणजेच रविवारी (दि. ८) साजरे केले जातील. त्यामुळे पहाटे अभ्यंगस्नान आणि सायंकाळी लक्ष्मी-कुबेरपूजन राहील. लक्ष्मीपूजनासाठी सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटे ते रात्री १० वाजून ५० मिनिटे असा मुहूर्त आहे. मंग‍ळवारी (दि. १०) बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याला वहीपूजनासाठी पहाटे २.१० ते ५.१०, सकाळी ६.३५ ते ७.२५ वाजेपर्यंत आणि सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंतचा मुहूर्त असेल.

गुरुवारी (दि. ५) वसुबारसने दिवाळीला सुरुवात होईल. शुक्रवारी (दि. ६) धनत्रयोदशी आणि यमदीपदान केले जाईल. रविवारी (दि. ८) नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन आहे. मंगळवारी (दि. १०) बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा, तर बुधवारी (दि. ११) भाऊबीज साजरी होईल, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.

असे आहेत मुहूर्त

लक्ष्मीपूजन : सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटे ते रात्री १० वाजून ५० मिनिटे.

दिवाळी पाडव्याला वहीपूजन : पहाटे २.१० ते ५.१० वाजेपर्यंत, सकाळी ६.३५ ते ७.२५ वाजेपर्यंत, सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language