Hashtagintro

‘Drishyam 3’ Box Office Collection : ‘दृश्यम 3’ बनला बॉलिवूडचा दुसरा मोस्ट प्रॉफिटेबल सिनेमा, तिसऱ्या भागानं केली बक्कळ कमाई, कमावले इतके कोटी

‘Drishyam 3’ Box Office Collection : ‘दृश्यम 3’ बनला बॉलिवूडचा दुसरा मोस्ट प्रॉफिटेबल सिनेमा, तिसऱ्या भागानं केली बक्कळ कमाई, कमावले इतके कोटी

अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई अजूनही चर्चेत आहे. रहस्य आणि थराराने भरलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनानंतर एकामागून एक नवे विक्रम केले आहेत. आता या चित्रपटाने बॉलिवूडमधील सर्वाधिक फायदेशीर थीक्क्वल चित्रपटांच्या यादीत दुसरं स्थान मिळवलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटान चित्रपटाच्या खर्चाशिवाय 250 कोटी रूपयांहून अधिक प्रॉफिट केला आहे.

22 दिवसांत कमाईचा मोठा टप्पा पार

‘दृश्यम 3’ ने प्रदर्शनाच्या 22 व्या दिवशी भारतात 1.40 कोटी रूपयांची कमाई केली. यामुळे चित्रपटाची एकूण भारतीय 1.40 कोटी भारतीय कमाई केली. यामुळे चित्रपटाची भारतातील कमाई 363.45 कोटींवर पोहोचली आहे. या चित्रपटांचं बजेट 110 कोटी होतं. तर या सिनेमाने खर्च वसूल तर केलाच पण त्याशिवाय 253.45 कोटी रूपयांची कमाईही केली.

सर्वाधिक फायदेशीर थ्रीक्कलच्या यादीत दुसरं स्थान

या कामगिरीमुळे ‘दृश्यम 3’ ने बॉलिवूडमधील सर्वाधिक फायदेशीर तिसऱ्या भागाच्या चित्रपटांच्या यादीत दुसरं स्थान मिळवलं आहे. या यादीत हेट स्टोरी 3 पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ‘दृश्यम 3’ चा क्रमांक लागला आहे. या यादीत मर्डर 3 , गोलमाल 3, धूम 3, आणि फुकरे 3 यांसारख्या चित्रपटांचाही समावेश आहे

‘Drishyam 3’

‘दृश्यम 3’ची नेमकी स्टोरी काय?

‘दृश्यम ‘ पासूनची स्टोरी विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाभोवती फिरत आहे. ‘दृश्यम 3’ मध्ये अजय देवगण विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसतो. कुटुंबाला वाचवण्यासाठी तो आखत असलेली रणनीची आणि पोलिसांशी सुरू असलेला संघर्ष यामुळे चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केलं आहे. यंदाच्या वर्षांतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांमध्येही ‘दृश्यम 3’ ने स्थान मिळवलं आहे. चित्रपटाच्या कमाईचे आकडे वेगवेगळ्या बॉक्स ऑफिस अहवालांनुसार बदलू शकतात.

 

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language