Hashtagintro

Fitness Tips: वेळ नाही म्हणून व्यायाम टाळताय? फक्त 7 मिनिटांचा हा वर्कआउट वेट लॉससाठी ठरेल उपयुक्त

Fitness Tips: वेळ नाही म्हणून व्यायाम टाळताय? फक्त 7 मिनिटांचा हा वर्कआउट वेट लॉससाठी ठरेल उपयुक्त

वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, पण व्यस्त दिनक्रमामुळे व्यायामासाठी वेळ मिळत नाही? अनेकदा वेळेच्या कमतरतेमुळे आपण व्यायाम टाळतो आणि फिटनेसकडे दुर्लक्ष होते. मात्र, फिट राहण्यासाठी दररोज तासन तास व्यायाम करण्याची गरज नाही. सकाळी फक्त ७ मिनिटे घरच्या घरी काही सोपे व्यायाम करू शकता. यासाठी जिममध्ये जाण्याची किंवा कोणत्याही खास उपकरणांची आवश्यकता नाही. घरात कुठेही उभे राहून हे व्यायाम करा. नियमित सरावामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास, शरीर सक्रिय राहण्यास आणि फिटनेस सुधारण्यास मदत होऊ शकते.

जंपिंग जॅक
लहानपणी तुम्ही हा व्यायाम खूप केला असेल. जर तुम्हाला तुमची फिटनेस जर्नी सुरू करायची असेल तर यापासून सुरुवात करा. पाय पसरून उभे राहा आणि हात वरच्या दिशेने उंचवा. मग उडी मारून पाय एकत्र ठेवून हात खाली आणा. हीच प्रक्रिया पुन्हा पुन्हा करा. हात वर नेताना पाय पसरवा आणि खाली येताना एकत्र आणा. फक्त ३० सेकंदात फास्ट करा किंवा जास्त वजन असल्यास हळूहळू करा.

वॉल सिट्स
हे तुम्हाला फिटनेस रूटीन सुरू करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करेल. भिंतीला आधार देऊन गुडघे ९० अंशावर वाकवून खुर्चीवर बसण्यासारखी पोज द्या. या स्थितीत ३० सेकंद थांबा आणि नंतर उभे राहा. एकदा व्यायाम सुरू केल्यावर तुम्ही वेळ आणि पुनरावृत्ती वाढवू शकता.

पुशअप्स
प्लँक पोझिशनमध्ये या आणि नंतर कोपरांवरून हात वाकवून शरीराला जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा आणि नंतर उचलण्याचा प्रयत्न करा. पुशअप्स सोपे करण्यासाठी सुरुवातीला गुडघे जमिनीवर टेकवून पुशअप्स करा. यामुळे पुशअप सुरू करणे सोपे जाते. मग हळूहळू तुमची लेव्हल वाढवा.

स्टेप अप
एखादी खुर्ची किंवा शिडीच्या पायरीवर दोन्ही पाय वारंवार ठेवून वर जा आणि खाली उतरा. हा स्टेप अप व्यायाम दोन्ही पायांनी करा.

स्क्वॅट
स्क्वॅट व्यायाम ३० सेकंदात करा. पायावर उभे रहा आणि खांदे आणि पाय समान अंतरावर ठेवा. आता गुडघे ९० अंशावर वाकवून मग उभे राहा. जसे तुम्ही खुर्चीवर बसत आहात अशा स्थितीत उभे राहिले पाहिजे.

हाय नी
एकाच जागी उभे राहून धावा. या दरम्यान गुडघे शक्य तितके छातीवर किंवा पोटाजवळ आणण्याचा प्रयत्न करा. हा व्यायाम ३० सेकंद करा. हे अधिक प्रभावी मार्गाने करण्यासाठी हात पसरवा आणि त्यांना कमरेजवळ ठेवा. उडी मारताना गुडघ्याच्या तळहाताला स्पर्श करा. यामुळे वेगाने वजन कमी होण्यास आणि ताकद वाढण्यास मदत होते.

Source: TV9 Marathi Health

Read full article on TV9 Marathi Health

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language