एफडी हा सुरक्षित गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. मुदत ठेव म्हणजेच पैसे एफडी केले तर तुमचे पैसे बुडण्याचा धोका नसतो. म्हणूनच अनेकजण गुंतवणुकीच्या या पर्यायाचा गांभीर्याने विचार करतात.
आता एफडी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे. काही बँकांनी एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. या बदलामुळे अनेक गुंतवणूकदारांना चांगला आर्थिक फायदा होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर नोव्हेंबर 2026 पासून कोणती बँक एफडीवर किती व्याज देत आहे ते जाणून घेऊ या. कोटक महिंद्र या बँकेतर्फे सामान्य नागरिकांना एफडीवर 6.80% व्याज दिले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 7.55% आहे.
अॅक्सिस बँकेकडून सामान्यांना एफडीवर 6.60% व्याज दिले जात आहे. सिनियर सिटीझनसाठी हा व्याजदर 7.35% टक्के आहे. कॅनरा बँकेसाठी हा व्याजदर 6.75 टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हाच व्याजदर 7.25 टक्के आहे.
(टीप- या लेखात दिलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. आम्ही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.)
Source: TV9 Marathi Business





