Hashtagintro

Gautami Patil: गौतमी पाटील आणि शिव ठाकरेने केलं लग्न? आईला कळताच… माधुरी दीक्षितने विचारताच सत्य समोर

Gautami Patil: गौतमी पाटील आणि शिव ठाकरेने केलं लग्न? आईला कळताच… माधुरी दीक्षितने विचारताच सत्य समोर

नृत्यांगना गौतमी पाटील ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिचा बिग बॉस विजेता शिव ठाकरेसोबतचा फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो पाहून गौतमी आणि शिव ठाकरेच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. आता दोघांनीही कोण होणार करोडपती या शोमध्ये हजेरी लावली. त्यावेळी शोची सूत्रसंचालक बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षितने दोघांनाही व्हायरल फोटोबाबत प्रश्न विचारला. त्यावर शिवने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.

कोण होणार करोडपती या शोमध्ये माधुरी दीक्षित, शिव ठाकरे आणि गौतमी पाटील यांच्यामध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. माधुरीने थेट दोघांना तुमचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता असे म्हटले होते. खरंतर शिव आणि माधुरी एका म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र झळकल्यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. याबद्दल बोलताना शिव म्हणाला की, त्याने गंमत म्हणून एका फोटोला ‘Finally’ अशी कॅप्शन दिले होते. मात्र, अनेकांना ती लग्नाची घोषणा वाटली आणि त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला. एका कार्यक्रमासाठी पोहोचल्यावरही ओळखीच्या लोकांनी त्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. अखेर, “अहो, माझं लग्न झालेलं नाही!” असं सांगत त्याला गैरसमज दूर करावा लागला.

शिव ठाकरेच्या आईला कळालं अन्…

हा गोंधळ केवळ शिवपुरता मर्यादित राहिला नाही, तर त्याच्या घरापर्यंतही पोहोचला. फोटो पाहिलेल्या नातेवाइकांनी त्याच्या आईला फोन करून मुलाच्या लग्नाबद्दल अभिनंदन करायला सुरुवात केली. काहींनी तर “आम्हाला लग्नाला का बोलावलं नाही?” अशी तक्रारही केली. शुभेच्छा आणि प्रश्नांचा भडिमार सुरू झाल्यावर आईची काय प्रतिक्रिया होती, हेही शिव या गप्पांमध्ये सांगतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

“तुझ्यामुळे नातेवाइकांचे फोन येत आहेत”

आईची प्रतिक्रिया आठवत शिव म्हणतो, “आई मला म्हणाली, ‘अरे खोडकरा! तुझ्यामुळे नातेवाइकांचे फोन येत आहेत. लग्नाला आम्हाला का बोलावलं नाही, असं विचारत आहेत!’” दुसऱ्याच दिवशी आपण याबाबत खुलासा केल्याचंही शिव सांगतो. मात्र, तोपर्यंत या फोटोमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. या फोटोमुळे घरी उडालेल्या गोंधळाचा शिवने सांगितलेला किस्सा माधुरींसोबतच्या गप्पांमध्ये हास्याची भर घालणार आहे. गौतमीही त्याच्यासोबत हॉट सीटवर असल्याने येत्या शनिवारच्या भागात प्रेक्षकांना आणखी रंजक किस्से, हशा आणि खेळाची उत्कंठा अनुभवायला मिळणार आहे.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language