बिग बॉस मराठी सिझन पाचमध्ये सहभागी झालेला छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे हा कायमच चर्चेत असतो. उंचीने लहान असलेल्या घनश्याम दरोडे हा छोटा पुढारी म्हणून ओळखला जातो. आता या छोट्या पुढारीचे वय काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया…
नुकताच छोटा पुढारीने एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला त्याचे वय किती आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर छोटा पुढारीने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मुलाखतीमध्ये बोलताना छोटा पुढारी म्हणाला की, माझं आणि शरद चंद्र पवार साहेबांचे वय हे अख्ख्या महाराष्ट्राला कधीच कळालेले नाही. कारण, त्यांच्याकडेही बघून वाटत नाही.. त्यांची जन्मतारीख 1212 आहे आणि माझी 2512 आहे.
पुढे तो म्हणाला की, त्यामुळे ते आणि मी आमच्या वयाचा अंदाज कोणी बांधू शकत नाही. माझे वय हे 21 वर्षे आहे. वयाच्या अवघ्या 21 वर्षात छोटा पुढारीने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.
काही दिवसांपूर्वी घनश्याम दरोडेने स्वत:च्या हक्काचे घर घेतले. या घराच्या कागदपत्रांवर सही करतानाचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी छोटा पुढारीने घर खरेदी केले आहे.
Source: TV9 Marathi Entertainment





