Hashtagintro

Girija Oak: मला हे आयुष्य तुझ्यासोबत..; पतीसाठी गिरीजा ओकची खास पोस्ट

Girija Oak: मला हे आयुष्य तुझ्यासोबत..; पतीसाठी गिरीजा ओकची खास पोस्ट

Girija Oak: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले सध्या तिच्या अभिनयासोबतच सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने नुकताच पती सुहृद गोडबोलेसोबतचा एक सुंदर फोटो शेअर करत त्याला लग्नाच्या 15 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोसोबत तिने लिहिलेलं कॅप्शन चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ‘हॅपी 15 वर्षे पार्टनर.. मला खूप आनंद आहे की मला हे आयुष्य तुझ्यासोबत जगायला मिळत आहे’, असं तिने म्हटलं आहे. आयुष्याचा प्रवास एकत्र करण्यासाठी जोडीदार मिळाल्याचा आनंद तिने या शब्दांत व्यक्त केला आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि मनोरंजनविश्वातील कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

गिरीजा ओकचा पती सुहृद गोडबोले हा मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक आहे. त्याचे वडील श्रीरंग गोडबोले हे देखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. सुहृदने ‘पुणे 52’ आणि ‘बाजी’ यांसारख्या मराठी चित्रपटांच्या निर्मितीशी संबंधित काम केलं आहे. चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनासोबतच त्याने गीतलेखन आणि इव्हेंट डिझाइनिंग क्षेत्रातही काम केलं आहे. तो कोक्वेलिकॉट पिक्चर्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून चित्रपट आणि ओटीटीसाठीही कार्यरत आहे. विशेष म्हणजे गिरीजा आणि सुहृद या दोघांचंही मनोरंजनविश्वाशी जवळचं नातं असल्यामुळे त्यांच्यातील समजूतदारपणा त्यांच्या नात्यात महत्त्वाचा ठरला आहे.

अशी सुरू झाली गिरीजा- सुहृदची लव्हस्टोरी

गिरीजा आणि सुहृदची पहिली भेट 2008 मध्ये दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात झाली होती. मात्र, त्यावेळी दोघांमध्ये फारसं बोलणं झालं नव्हतं. त्यानंतर एका प्रोजेक्टच्या निमित्ताने त्यांचा पुन्हा संपर्क आला. एका कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी गिरीजाची निवड झाली होती. त्यावेळी सुहृदने तिला फोन करून कार्यक्रमाच्या तारखा, मानधन आणि कॉस्च्युम याबद्दल चर्चा केली होती. गोव्यामध्ये शूटिंगदरम्यान दोघांची प्रत्यक्ष भेट झाली. त्यावेळी त्यांच्यातील एक मजेशीर समानता लक्षात आली. दोघांनाही गणिताची फारशी आवड नव्हती. गोव्यातील बाजारात खरेदी करताना सामानाची बेरीज करण्यासाठी दोघेही मोबाइलमधील कॅल्क्युलेटरचा वापर करत होते. हा किस्सा सांगताना गिरीजाने आम्ही दोघंही एकसारखेच आहोत, असं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्या काही मित्रांनी एकमेकांना डेट करून पाहण्याचा सल्ला दिला. दोघांनीही एका कॅफेमध्ये भेटण्याचा निर्णय घेतला आणि हळूहळू त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं.

गिरीजा आणि सुहृदने 2011 मध्ये हिंदू विवाहपद्धतीनुसार लग्न केलं. त्यांच्या लग्नाची गोष्टही तितकीच हटके आहे. गिरीजाचे आई-वडील विभक्त झालेले असल्यामुळे लग्नाच्या बोलणीच्या वेळी तिच्या कुटुंबाकडून नेमकं कोणाशी बोलायचं, असा प्रश्न सुहृदच्या कुटुंबीयांना पडला होता. त्यावेळी गिरीजाने स्वतःच माझ्याशी लग्नाची बोलणी करा, असं सांगितलं होतं. दोघांना साधेपणाने लग्न करायचं होतं. मात्र, गिरीजाच्या आईची लेकीचं लग्न थाटामाटात व्हावं अशी इच्छा होती. अखेर कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language