Hashtagintro

Gokul Chairman Rajesh Patil | चंदगडला ६३ वर्षानंतर 'गोकुळ'चे अध्यक्षपद! गावांमध्ये फटाके वाजवून आनंदोत्सव

Kolhapur Gokul Dairy News

संदीप तारिहाळकर

चंदगड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ तथा गोकुळ या संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांची वर्णी लागली. राज्यभर चर्चेत असणारी व महायुतीसाठी मोठी प्रतिष्ठा बनलेल्या या अध्यक्षपदाच्या निवडीने गोकुळ संघाच्या स्थापनेनंतर, ६३ वर्षानंतर चंदगडला प्रथमच अध्यक्षपदाचा मान मिळाला. यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या गोटात भर दिवाळीत आनंद द्विगुणित झाला आहे.

बुधवारी दुपारनंतर चंदगड मतदारसंघांमध्ये विविध गावांमध्ये फटाके वाजवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. चंदगड मधील कार्यकर्त्यांनी कोल्हापूर येथे माजी आमदार राजेश पाटील यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष व्यक्त केला.

गोकुळ संघाच्या निवडणूक पूर्व काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक व चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळ मध्ये कोट्यावधींचा गैरव्यवहार होत असल्याच्या आरोपावरून तसेच गोकुळ मध्ये चंदगडकरांना संधी देत नसल्याच्या कारणावरून खळबळ उडून दिली होती. यामध्ये त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना न्यायालयीन लढाई दरम्यान व अध्यक्ष निवड प्रक्रिये पर्यंत सातत्याने आरोप करत लक्ष्य केले.

यादरम्यान मंत्री मुश्रीफ यांनी राजकीय खेळी करत अध्यक्षपदाचा मान चंदगडला देऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मोठे बळ दिले आहे. मंत्री मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांचा या संघाच्या निवडणुकीत पराभव झाला, मात्र चंदगड मधून राजेश पाटील यांच्या मदतीने नवीद मुश्रीफ यांना मताधिक्य दिले आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत याची त्यांना पोचपावती मिळाली आहे. दिवंगत माजी आमदार नरसिंगराव पाटील यांच्या घरी राजेश पाटील यांच्या रूपाने दुसऱ्यांदा संचालकपद व चंदगड तालुक्यात ६३ वर्षानंतर अध्यक्षपद मिळाले आहे.

चंदगड तालुक्यात १९९० च्या सुमारास सर्वप्रथम नरसिंगराव गटातून मारुती कांबळे (किटवाड), यानंतर माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांच्या गटातून महादेव कांबळे (बसर्गे ), यानंतर याच गटातून नामदेव कांबळे (नांदवडे) यानंतर दीपक भरमूअण्णा पाटील व राजेश नरसिंगराव पाटील एकाच वेळेला संचालक होते. यानंतर आता राजेश पाटील यांची अध्यक्षपदी वर्णी लागली.

या दरम्यान मागील पंचवार्षिक निवडणुकीत राजेश पाटील यांच्या पत्नी सुश्मिता पाटील व माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांचे चिरंजीव दीपक पाटील या दोघांनाही पराभवाचा फटका बसला होता. आताच्या निवडणुकीत आमदार शिवाजी पाटील समर्थक दीपक पाटील यांना सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले, आणि त्यांच्याच पारंपारिक विरोधी गटाला यंदा अध्यक्षपदही मिळाले.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language