Hashtagintro

Gokul Sangharsh Morcha : सत्ता परिवर्तनाची सुरुवात 'संघर्ष भूमी' असणाऱ्या कोल्हापुरातूनच होणार : सतेज पाटील यांचा निर्धार

Gokul Sangharsh Morcha Kolhapur : “गोकुळ निवडणुकीचे रणांगण सहा महिन्यांपूर्वी सुरू झाले. गोकुळवर प्रशासक आणू नका, असे आवाहन आम्ही केले होते. मात्र दुर्दैवाने गोकुळवर प्रशासक नियुक्त करण्यात आला. राज्य सरकार सूडबुद्धीने वागत आहे. सहकार कायदा पायदळी तुडवण्याचे काम सरकार करत आहे. गोकुळमध्ये शासन नियुक्त चार संचालकांची नियुक्त करून हे आज सिद्ध झाले आहे. सहकार क्षेत्र मोडून काढण्याचं काम सरकारने सुरू केले आहे,” असा आरोप करत सहकार क्षेत्र मोडण्याचे सरकारचे षडयंत्र सुरू आहे, आता २०२९ मधील सत्ता परिवर्तनाची सुरुवात संघर्ष भूमी असणार्‍या कोल्‍हापूरमधून होणार, असा निर्धार काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केला. संघर्षमोर्चाचे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language