Hashtagintro

Gold Buy: 1 रुपयात 24 कॅरेट सोनं करा खरेदी, दसऱ्याच्या साडेतीन मुहूर्तावर साधा सुवर्णयोग

Gold Buy: 1 रुपयात 24 कॅरेट सोनं करा खरेदी, दसऱ्याच्या साडेतीन मुहूर्तावर साधा सुवर्णयोग

Digital Gold Buy on Dasara : साडेतीन मुहूर्तापैकी एका दसऱ्याला तुम्हाला झटपट सोनं खरेदी येऊ शकते. डिजिटल सोन्यात गुंतवणुकीची चांगली संधी ग्राहकांना उपलब्ध आहे. अवघ्या 1 रुपयात सोन्यात तुम्हाला ऑनलाईन सोनं खरेदी करता येऊ शकते. आजच्या मुहूर्तावर सोन्याचे डिजिटल सर्टिफिकेटची प्रिंट काढून पुजेतही ठेवता येते. आज तुम्हाला सुवर्णयोग साधता येईल. भविष्यात सोन्याचा भाव जसा वाढेल. तुमच्या गुंतवणुकीचा फायदा होईल. विशेष म्हणजे तुम्ही हे सोने ठोकळा, नाणे, तुकड्याच्या रुपात मिळवू शकता.

गुंतवणूकदार कुठे गुंतवणूक करतात?

गुंतवणूकदार गोल्ड ईटीएफ, इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स आणि एक्सचेंज-ट्रेडेड कमोडिटी डेरिव्हेटिव्स यांचा समावेश आहे. हे उत्पादन मान्यता प्राप्त स्टॉक एक्सचेंजवर ते व्यापार करतात. सेबीच्या नियमातंर्गत हा व्यापार करण्यात येतो. सेबीच्या मते, गुंतवणूक नेहमीच नोंदणीकृत मध्यस्थांमार्फत करावी. नोंद नसलेल्या व्यक्तींमार्फत व्यापार केल्यास धोका संभवतो.

डिजिटल सोन्याची इथं करा खरेदी

गेल्या काही वर्षांत अनेक खासगी कंपन्यांचे ॲप्स आणि संकेतस्थळ आहेत. त्याआधारे ऑनलाईन खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. यामध्ये टाटा समूहाचा कॅरेलटेन, सेफगोल्ड, तनिष्क आणि MMTC-PAMP सारख्या कंपन्या डिजिटल गोल्ड ऑफर देतात. फोनपे, गूगल पे आणि पेटीएम सारखे ॲप सुद्धा या कंपन्यासोबत बाजारात आहेत. अनेक युझर्सला या प्लॅटफॉर्मच्या, ॲप्सच्या आणि साईटच्या माध्यमातून ऑनलाईन सोने खरेदीचा पर्याय मिळतो. सोप्या आणि सुटसुटीत प्रक्रियेमुळे त्यांना सहज सोने खरेदी करता येते.

डिजिटल गोल्डमधील गुंतवणुकीचे फायदे

घरबसल्या डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करता येते

हे सोने तुम्ही घर बसल्या फिजिकल रुपात मागवू शकता

डिजिटल गोल्डमध्ये कमीत कमी रुपयांपासून गुंतवणूक करता येते

ऑनलाईन कर्जासाटी डिजिटल गोल्डचा आधार घेता येतो

डिजिटल गोल्ड अस्सल असते. त्यात भेसळ नसते.

याची शुद्धता सेफ गोल्ड रुपात 99.5 तर MMTC PAMP बाबत 999.9 असते.

डिजिटल गोल्ड सुरक्षितरित्या ठेवल्या जाते. डिजिटल सोन्यावर 100 टक्के विमा मिळतो

तुम्ही डिजिटल गोल्ड आभुषणे, दागिने, सोन्याचे शिक्यात बदलवू शकता.

Source: TV9 Marathi Business

Read full article on TV9 Marathi Business

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language