Hashtagintro

Gold Rate : सोनं झटक्यात 100000 रुपयांवर येणार? सराफा बाजारात होणार मोठा उलटफेर

Gold Rate : सोनं झटक्यात 100000 रुपयांवर येणार? सराफा बाजारात होणार मोठा उलटफेर

गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे खरेदीदारांसाठी ही मोठी सुवर्ण संधी आहे. वायदे बाजारात चांदीच्या दरात दणादण घट होताना दिसत आहे. किंमती पिवळा धातू म्हणजे सोनंही स्वस्त होताना दिसत आहे. मल्टिकमोडीटी एक्सचेंज म्हणजे MCX वर सोमवारी सोनं एका झटक्यात 2300 रुपयांनी स्वस्त झालं आहे. सोन्या चांदीच्या दरातील ही घसरण पाहून काही दिवसांपूर्वी तज्ज्ञांनी व्यक्त केलेलं भाकीत खरं होताना दिसत आहे. सोन्याचा भाव एक लाखांपर्यंत घसरू शकतो, असं भाकीत तज्ज्ञांनी वर्तवलं होतं. ते खरं होताना दिसत आहे.

आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी एमसीएक्सवर वायदे बाजार सुरू होता, त्यावेळी सोनं आणि चांदीचे भाव धाडकन कोसळले. MCX Gold Rate मध्ये आलेल्या बदलावर नजर टाकली तर 4 डिसेंबरच्या एक्सपायरीवालं 10 ग्रॅम 24 कॅरेट सोनं गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 1,36,705 रुपयांवर क्लोज झालं होतं. मात्र, आज बाजार उघडताच मोठी घसरण पाहायला मिळाली. सोनं 1,35,312 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आलं. त्यानंतर बाजार वाढण्याऐवजी सोन्या चांदीचे दर घसरतच आले. आज दुपारपर्यंत सोन्याचा भाव 1,34,385 रुपयांपर्यंत आला होता. कॅलक्यूलेशन केलं तर आज सोनं 2320 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त झालं आहे.

सोन्याचे दर घसरतच आहेत

4 डिसेंबरच्या एक्सपायरीवालं 24 कॅरेट सोनं एमसीएक्सवर लाइफ टाइम हाय लेव्हल 1,77,590 रुपयांवर असून घसरण अजून होताना दिसत आहे. सध्याच्या दराची तुलना केली तर आता 10 ग्रॅम 24 कॅरेट सोनं या हाय लेव्हलवरून 42,278 रुपयांपर्यंत स्वस्त झालं आहे. म्हणजे वायदे बाजारात सोन्यात गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर ही संधी उत्तम आहे.

सोनं 1 लाखावर येणार?

सोन्याच्या किंमतीत रेकॉर्ड करेक्शन पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जानेवारीत रेकॉर्ड हायवरून सोनं 30 टक्क्यांनी खाली आलं आहे. तर भारतीय बाजारातही सोन्याचे दर घसरण्याची शक्यता आहे. फेस्टिव्ह सीजनमध्ये सोनं स्वस्त झालं होतं. तर लग्नाच्या सीजनच्या आधीच सोन्याचे दर घसरत असल्याने ग्राहकांची चांदीच झाली आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात आलेल्या रिपोर्ट्स नुसार, सोन्यात शॉर्ट टर्म करेक्शनची मोठी शक्यता आहे. ती खरी ठरताना दिसत आहे.

एक्सपर्ट्सचा अंदाज पाहिला तर, या शॉर्ट टर्ममध्ये आंतरराष्ट्रीय स्पॉट गोल्डमध्ये 4,025-3,950 डॉलर प्रति औंस पर्यंत घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि भारतीय बाजारातही सोन्याचं करेक्शन होण्याची शक्यता वर्तवली होती. सोनं सुमारे 1-1.25 लाख रुपयांवर येणार असल्यांचही सांगण्यात आलं होतं. मात्र, अमेरिकन 10 वर्षीय बॉन्ड यील्डमध्ये तेजी आली तर हे शक्य होणार आहे.

चांदीचे दरही घसरणार

सोन्या पाठोपाठ चांदीच्या किंमतीतही घसरण होत आहे. एमसीएक्सवर सोमवारी वायदे बाजाराची सुरुवात होताच 4 डिसेंबरच्या एक्सपायरीवाल्या चांदीची किंमत 6000 रुपये वा 3 टक्क्याहून अधिक ज्यादा घसरूण 1.70 लाख रुपये प्रति किलो लेव्हलवर आली आहे. या मोठ्या घसरणीनंतरही चांदी आपल्या लाइफ टाइम हाय 4,20,048 रुपयांच्या जवळ 2.50 लाख रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे.

(नोट: सोने-चांदी वा गोल्ड-सिल्व्हर ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या सल्लागारांचा सल्ला घ्या.)

Source: TV9 Marathi Business

Read full article on TV9 Marathi Business

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language