Hashtagintro

Gold Silver Outlook: पुढील वर्षी चांदी 5 लाख रुपयांचा टप्पा ओलांडणार! तर सोन्याचा काय असेल भाव?

Gold Silver Outlook: पुढील वर्षी चांदी 5 लाख रुपयांचा टप्पा ओलांडणार! तर सोन्याचा काय असेल भाव?

सोन्या- चांदीच्या दरात सातत्याने चढ- उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बऱ्यापैकी घसरणही बघायला मिळत आहे. जरी सध्या सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण दिसून येत असली, तरी या दोन्ही धातूंचे भविष्य आशादायक आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे (IBJA) सचिव सुरेंद्र मेहता यांच्या अंदाजानुसार, 2027 च्या शेवटी सोन्याच्या किमती या 6,200 डॉलर प्रति औस आणि चांदीच्या किमती या 180 डॉलर प्रति औस पर्यंत पोहचू शकतात. या हिशोबाने भारतात सोनं प्रति 10 ग्रॅम 1.87 लाख रुपयेच्या पुढे जातील तर चांदी तब्बल 5,45,100 रुपये प्रति किलोग्राम होईल.

सध्या किमतीमध्ये चढ-उतार!

IBJA सचिव सुरेंद्र मेहता नुसार, पुढच्या काही वेळपर्यंत सोने आणि चांदीवर दबाव राहील. त्यांच्यानुसार जागतिक बाजारपेठेत या मौल्यवान धातूंची मागणी वाढत असल्याचे संकेत त्यांना दिसत आहेत. त्यांचे असे मत आहे की, सध्याच्या घसरणीकडे दुर्लक्ष न करता गुंतवणूकदारांनी सोन्याकडे लक्ष दिले पाहिजे.

2027 च्या शेवटपर्यंत कुठे पोहचणार सोने-चांदी?

IBJA सचिव सुरेंद्र मेहतानुसार असा अनुमान आहे की, 2027 च्या शेवटपर्यंत सोने हे 6,200 डॉलर प्रति औस तर चांदी 180 डॉलर प्रति औस पर्यंत पोहचू शकतो. पण, सध्या बाजारातील अस्थिरता कायम राहू शकते आणि किमतींची दिशा विविध जागतिक घटकांवर अवलंबून असेल.

सोन्या-चांदीची किंमती का घसरण आहेत?

IBJA सचिव सुरेंद्र मेहतानुसार, सोने आणि चांदीच्या किंमतीच्या घसरणीच्या मागे अनेक कारणे आहेत. यामध्ये कच्च्या तेलाच्या किंमती पासून ते अमेरिकेतील व्याजदरांबाबत असलेली अनिश्चितता यांचा समावेश आहे.अमेरिकेची मध्यवर्ती बँक, ‘फेडरल रिझर्व्ह’, पुढील पाऊल काय उचलणार याबद्दल स्पष्टता नाही. याच कारणांमुळे सोने-चांदी सारख्या मौल्यवान धातूंवर दबाव कायम राहू शकतो. बाजाराचे लक्ष फेडरल रिझर्व्हच्या डिसेंबर महिन्यातील धोरणाकडे लागले आहे.

धनत्रयोदशी-दिवाळीदरम्यान 61-62 टनांहून अधिक सोन्याची विक्री!

घसरलेल्या किंमतीच्या फायदा घेत अनेकांनी सोने-चांदीची खरेदी केली. धनत्रयोदशी-दिवाळीदरम्यान 61-62 टनांहून अधिक सोन्याची विक्री झाली. याशिवाय याच दरम्यान 330-340 टन पर्यंत चांदीची विक्री झाली. कमी किमती, लग्नसराईचा काळ आणि आगाऊ बुकिंग करण्याच्या वाढत्या कलानं खरेदीच्या हालचालींना चालना दिली आहे.

Source: TV9 Marathi Business

Read full article on TV9 Marathi Business

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language