Hashtagintro

Gondhal: ऑस्करकडे झेप घेणाऱ्या ‘गोंधळ’चा ट्रेलर पाहिलात का? लग्न, गूढ घटना अन् बरंच काही; अंगावर येईल शहारा!

Gondhal: ऑस्करकडे झेप घेणाऱ्या ‘गोंधळ’चा ट्रेलर पाहिलात का? लग्न, गूढ घटना अन् बरंच काही; अंगावर येईल शहारा!

भारताची ऑस्करसाठी अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झालेल्या ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाचा ग्लोबल ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या या चित्रपटाची सध्या मनोरंजनविश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट एक-दोन नव्हे, तर तब्बल सात भाषांमध्ये जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे मराठी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची मोठी संधी मिळणार आहे. 13 नोव्हेंबर 2026 रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, त्याच्या कथेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘गोंधळ’ हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजी अशा सात भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. मराठी चित्रपटासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. भारतासह अमेरिका, ब्रिटन, युरोप, ऑस्ट्रेलिया, दुबई आणि आफ्रिकेतील प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोहोचवण्याची निर्मात्यांची योजना आहे. महाराष्ट्रातील लोकपरंपरा, संस्कृती आणि ग्रामीण जीवनाची पार्श्वभूमी असलेली ही कथा जागतिक प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक संतोष डावखर यांनी केला आहे. चित्रपटाला ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड मिळाल्याने या चित्रपटाकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

पहा व्हिडीओ-

काय आहे ‘गोंधळ’ची कथा?

‘गोंधळ’ हा मानसशास्त्रीय थरारपट आहे. या चित्रपटाची कथा सुमन नावाच्या तरुण विवाहित महिलेभोवती फिरते. वैवाहिक आयुष्यातील असमाधान, नात्यांमधील गुंतागुंत, मानवी इच्छा आणि विश्वासघात अशा अनेक पैलूंना या चित्रपटात स्पर्श करण्यात आला आहे. कथेत पारंपरिक गोंधळ विधीला महत्त्वाचं स्थान आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा भाग असलेल्या या विधीच्या पार्श्वभूमीवर अनेक गूढ घटना घडतात. वैयक्तिक स्वार्थ, आसक्ती आणि गावातील सत्तासंघर्ष यांमुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनते. पवित्र विधीच्या वातावरणात उलगडणारी रहस्ये आणि पात्रांच्या आयुष्यातील अनपेक्षित वळणं प्रेक्षकांना खिळवून ठेवतील, अशी अपेक्षा आहे.

या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निशाद भोईर आणि अनुज प्रभू हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती संतोष डावखर यांनी केली आहे. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी ज्येष्ठ संगीतकार इलैयाराजा यांनी सांभाळली आहे.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language