Hashtagintro

Grey Hair : पांढरे केस लपवण्यासाठी डाय नको! घरच्या घरी बनवा हा नैसर्गिक हेअर मास्क

Grey Hair : पांढरे केस लपवण्यासाठी डाय नको! घरच्या घरी बनवा हा नैसर्गिक हेअर मास्क

Hair Mask: आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या अनेकांना जाणवते. केसांचा नैसर्गिक काळेपणा टिकवण्यासाठी बाजारातील हेअर डायरऐवजी तुम्ही घरगुती उपायांचा वापर करू शकता. जाणून घ्या, पांढऱ्या केसांची समस्या कमी करण्यासाठी कोणता हेअर मास्क वापरता येईल.

आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः तरुण मुला-मुलींना या समस्येचा सामना करावा लागत आहे. पांढरे केस लपवण्यासाठी अनेक जण मेहंदी किंवा केमिकलयुक्त हेअर कलरचा वापर करतात. मात्र, वारंवार हेअर कलर किंवा डाय लावल्याने केसांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. काहींना केस गळणे, केस कोरडे होणे अशा समस्यांचाही सामना करावा लागतो. त्यामुळे केसांचा नैसर्गिक रंग टिकवण्यासाठी अनेक जण घरगुती उपाय शोधतात. तुम्हाला सुद्धा घरगुती उपाय करायचा असेल तर तुम्ही असाच एक हेअर मास्क ट्राय करू शकता. हा मास्क घरी सहज तयार करता येतो. जाणून घेऊया, हा हेअर मास्क बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि तो केसांना कसा लावायचा.

पांढऱ्या केसांसाठी वापरून पाहा हा हेअर मास्क
कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या जाणवत असेल, तर केसांची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. शरीराला आवश्यक पोषक घटक न मिळणे, तसेच केमिकलयुक्त शॅम्पू आणि तेलांचा अतिवापर यांसारख्या कारणांमुळे केसांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशा वेळी तुम्ही हा हेअर मास्क वापरून पाहू शकता. हा मास्क घरी कसा तयार करायचा, ते जाणून घेऊया.

हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहेत या गोष्टी –
– १०० ग्रॅम नारळाचे तेल
– २० ग्रॅम काळे जिरे (कलौंजी)
– एक मूठभर कढीपत्ता
– दोन चमचे मेथी दाणे

असे बनवा हेअर मास्क
हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका पॅन किंवा कढईत खोबरेल तेल गरम करा. आता आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी तेलात टाकून भाजून घ्या. त्यांचा रंग डार्क होईपर्यंत ते नीट भाजा. ते काळे पडले तरी चालेल. आता या सर्व गोष्टींची पेस्ट बनवा.

कसा लावावा हेअर मास्क
आता तयार केलेली पेस्ट केसांच्या मुळांवर नीट लावून घ्या. साधारण ३० मिनिटे हा मास्क केसांवर राहू द्या. त्यानंतर सल्फेट-फ्री शॅम्पूने केस धुवा.
टीप – घरगुती उपाय असला तरी वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language