Hashtagintro

Hina Khan: उद्या मी असेन की नाही, म्हणून 15 मिनिटांत निर्णय..; पतीबद्दल हिना खानचा खुलासा, ऐकून सानिया मिर्झाही चकीत!

Hina Khan: उद्या मी असेन की नाही, म्हणून 15 मिनिटांत निर्णय..; पतीबद्दल हिना खानचा खुलासा, ऐकून सानिया मिर्झाही चकीत!

Hina Khan: टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान आणि रॉकी जैस्वाल यांची प्रेमकहाणी सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. तब्बल 13-14 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडीने जून 2025 मध्ये लग्न केलं. मात्र, त्यांच्या लग्नामागची कहाणी ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, हिना खानने कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत असताना अवघ्या 15 मिनिटांपेक्षाही कमी वेळात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. नुकत्याच सानिया मिर्झाच्या शोमध्ये हिनाने आपल्या लग्नाचा हा भावूक किस्सा सांगितला. हिना खान नुकतीच टेनिसपटू सानिया मिर्झाच्या ‘सर्व्हिंग इट अप विथ सानिया’ या शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने रॉकी जैस्वालसोबतच्या लग्नाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. लग्नाचा फोटो पाहिल्यानंतर हिना जुन्या आठवणींमध्ये रमली आणि भावूक झाली.

हिना म्हणाली, “आम्ही लग्न करण्याचा कोणताही प्लॅन केला नव्हता. हा अगदी अचानक घेतलेला निर्णय होता. आम्ही 13-14 वर्षांपासून एकत्र होतो. माझ्या आरोग्याबाबत जे काही सुरू होतं, त्यावेळी मी रॉकीला सांगितलं की, एकतर तू पुढे जा आणि तुला हवं असेल तिच्याशी लग्न कर किंवा मग माझ्याशीच लग्न कर. कारण उद्या काय होईल, हे मला माहीत नाही.” हिनाचं हे बोलणं ऐकून सानिया मिर्झाही आश्चर्यचकित झाली. तिने खरंच 15 मिनिटांत लग्न केलं का, असा प्रश्न विचारला. त्यावर हिनाने सांगितलं की, प्रत्यक्षात 15 मिनिटांपेक्षाही कमी वेळात त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.

पहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by @servingitupwithsania

हिना खानला जून 2024 मध्ये स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झालं होतं. या कठीण काळात रॉकी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. उपचार, मानसिक संघर्ष आणि भविष्याबद्दलची अनिश्चितता अशा अनेक आव्हानांना हिनाला सामोरं जावं लागलं. याच परिस्थितीत दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 4 जून 2025 रोजी मुंबईतील आपल्या घराच्या टेरेसवर मोजक्या नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केलं.

हिना म्हणाली की, लग्नामुळे त्यांच्या नात्यात काहीही बदल झालेला नाही. लग्न असो किंवा नसो, त्यांचं नातं आधीपासूनच मजबूत होतं. विशेष म्हणजे, दोघं इतके बिनधास्त आहेत की त्यांना पहिल्या लग्नाचा वाढदिवसही आठवला नव्हता. कुटुंबीय आणि मित्रांनी शुभेच्छा दिल्यानंतर त्यांना लग्नाच्या वाढदिवसाची आठवण झाली.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language