Hashtagintro

IND A vs PAK A सामन्यात गोंधळ! ‘डेड बॉल’ देताच पाकिस्तानी खेळाडू थेट अंगावर धावून गेले; नेमकं काय घडलं? Video Viral

IND A vs PAK A सामन्यात गोंधळ! ‘डेड बॉल’ देताच पाकिस्तानी खेळाडू थेट अंगावर धावून गेले; नेमकं काय घडलं? Video Viral

2026 एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत पाकिस्तान ‘अ’ आणि भारत ‘अ’ यांच्यातील सामना चांगलाच नाट्यमय ठरला. सामान्य दरम्यान दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये अनेकदा गदारोळ पाहायला मिळाला. एकीकडे पाकिस्तानी खेळाडू वैभव सूर्यवंशी आणि हर्षित राणा सोबत वाद घालण्याचा प्रयत्न करत होते तर दुरीकडे काही खेळाडू अंपायरच्या निर्णयावरून भांडत होते. हे सगळं भारताच्या 44 व्या ओव्हरमध्ये बघायला मिळालं. या ओव्हरमध्ये एका डेड बॉलच्या निर्णयामुळे मोठा वाद झाला. पाकिस्तानी खेळाडूंनी अंपायरचा निर्णय स्वीकारण्यास नकार दिला आणि मैदानावर वाद घालताना दिसले, तेव्हा काही काळासाठी सामना थांबवावा लागला.

अंपायरसोबत भिडले दोन खेळाडू

44 व्या षटकातील पहिल्या चेंडूच्या वेळी, गोलंदाज ‘ओव्हर द विकेट’ गोलंदाजी करत असताना तिलक वर्मा चुकीच्या बाजूला उभा होता. चेंडू टाकून झाल्यानंतर अंपायरच्या हे लक्षात आले आणि त्यांनी तो चेंडू ‘डेड बॉल’ (dead ball) घोषित केला.

पाकिस्तानी कर्णधार या निर्णयाने खुश न्हवता. तो मैदानात असलेल्या अंपायरशी बोलू लागला आणि त्यावेळी फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात स्पष्ट तणाव जाणवत होता. तिथून निघण्यापूर्वी तिलक वर्मा पाकिस्तानच्या कर्णधाराशी काहीतरी बोलला. पाकिस्तानी खेळाडूंनी अंपायरही खुप वेळ चर्चा केली. अली रझा ‘ओव्हर द विकेट’ गोलंदाजी करायला येत असल्याची अंपायरला कल्पना होती की नाही हे स्पष्ट नाही. हे ते मान्य करण्यास तयार नव्हते. पाकिस्तानच्या कर्णधाराने मैदानावर असलेल्या अंपायरशी बोलून आपली नाराजी व्यक्त केली. मैदानावर काही काळ चर्चा झाली, त्यानंतर पुन्हा खेळाला सुरुवात झाली.

पाकिस्तानकडून भारत ‘अ’ संघाचा पराभव!

पाकिस्तानने भारताचा ४८ धावांनी पराभव केला. पाकिस्तान ‘अ’ संघाने ३१३ धावा उभारल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ २६५ धावाच करू शकला. भारत ‘अ’ संघासाठी तिलक वर्माने १०० धावा केल्या, तर अभिषेक शर्माने ७० धावांचे योगदान दिले. भारतीय संघाचा पुढचा सामना संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध आहे. हा सामना जिंकून भारत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करू शकतो; मात्र, त्यासाठी त्यांना संयुक्त अरब अमिरातीचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागेल.

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language