Hashtagintro

IND vs NZ कसोटी मालिकेपूर्वी गिलची पत्रकार परिषद, बुमराहपेक्षाही ‘तो’ महत्त्वाचा, कोणाची बाजू घेतली?

IND vs NZ कसोटी मालिकेपूर्वी गिलची पत्रकार परिषद, बुमराहपेक्षाही ‘तो’ महत्त्वाचा, कोणाची बाजू घेतली?

Shubman Gill On Ind vs NZ Test: भारत न्यूजीलंड यांच्यात टी-२० आणि वनडे मालिका पार पडल्या. या दोन्ही मालिका भारतीय संघाला जिंकण्यात यश मिळाले. दोन्ही मालिका श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जिंकली. आता कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारत न्यूझीलंड कसोटी मालिकेला १९ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. कर्णधार शुभमन गिलने या मालिकेपूर्वी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्याने अनेक मुद्दे मांडले आहेत.

भारतीय कर्णधार शुभमन गिलने मंगळवारी सांगितले की, “न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत संघ निश्चितपणे चार वेगवान गोलंदाजांसह खेळेल आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या फॉर्म आणि तंदुरुस्तीबद्दल उपस्थित असलेल्या चिंताही फेटाळून लावल्या.”

पहिल्या कसोटीपूर्वी शुभमन गिल काय म्हणाला?

गुरुवारपासून येथे सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी शुभमन गिल म्हणाला, ‘आम्ही निश्चितपणे चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरू. ” नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान युवा वेगवान गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीचा उल्लेख करताना भारतीय कर्णधार म्हणाला, “आमच्या सर्व वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे आणि हे संघासाठी चांगले आव्हान आहे.”

जसप्रीत बुमराहही पुनरागमन करणार

भारताने वनडे मालिका ३-१ ने जिंकली होती. वरिष्ठ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनामुळे भारतीय आक्रमणाला बळ मिळेल. मर्यादित षटकांच्या मालिकेत प्रभावी कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारचाही फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या जागी कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. गिल म्हणाला, ‘आम्हाला चार वेगवान गोलंदाजांची गरज आहे, पण कोण खेळणार हे ठरलेले नाही. तिसऱ्या दिवसापासून खेळपट्टी सपाट झाल्याचे आपण पाहिले आहे आणि खेळपट्टीवर चेंडूला चांगला मारा करू शकणारा गोलंदाज हवा आहे.

ऋषभ पंतच्या खेळाबद्दल पंत काय म्हणाला?

भारतीय कर्णधारानेही फिटनेसच्या समस्यांशी झगडत असलेल्या पंतला पाठिंबा दिला. गिल म्हणाला, ‘ऋषभ पंतबाबत कोणतीही दुविधा नाही. त्याने 50 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने जगभरात धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियात शतक झळकावणारा तो यष्टीरक्षक आहे.”

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language